Last Updated: Wednesday, March 20, 2013, 19:40
www.24taas.com, मुंबईमनसे आमदार राम कदम यांनी आपण स्वतःहून अटक होणार असल्याचं जाहीर केलं आहे. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
सचिन सूर्यवंशी यांना केलेल्या मारहाणीनंतर बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी राम कदम यांनीही आपल्यावर मनसे पक्षाचे संस्कार असून मी सूर्यवंशीना मारहाण केली नाही, असं स्पष्टीकरण दिलं होतं. उलट सूर्यवंशींनीच मला धक्काबुक्की करून पाडलं होतं, असं त्यांनी विधान केलं होतं.
मात्र सचिन सूर्यवंशींनी दिलेल्या जबाबात राम कदम यांनी मारहाण केल्याचं आणि गळा दाबून धमकी दिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पाच आमदारांचं निलंबन झालं आहे आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राम कदम यांनी अटक होण्याचे स्पष्ट केलं.
First Published: Wednesday, March 20, 2013, 19:29