Last Updated: Wednesday, March 20, 2013, 09:07
www.24taas.com, मुंबई एपीआय सचिन सूर्यवंशींना आमदारांनी मारहाण केल्याच्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. विधानभवनातच त्यांना ही मारहाण करण्यात आल्यानं, मोठी खळबळ उडालीय. मारहाणीचा आरोप असणाऱ्या आमदारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय. मात्र प्रत्यक्ष मारहाण झालेल्या सचिन सूर्यवंशींचं काय म्हणणं आहे, ते आता आपण जाणून घेणार आहोत. या प्रकारामध्ये ज्यांना मारहाण झाली, त्या सचिन सूर्यवंशींनी पोलिसांना काय जबाब दिलाय, त्याचं EXCLUSIVE फुटेज ‘झी २४ तास’च्या हाती लागलंय.
‘राम कदमांनी मारायला पहिली सुरूवात केली... त्यांनी डोक्यावर मारलंय... एक जण इथं नरड्यावर उभा राहिला होता.... फुटेज बघितलं तर त्यामध्ये सगळं लक्षात येईल... माझी पहिलीही कारवाई चूक नव्हती... आणि आताचीही नाही... पण, आपल्या बाजुने कोण आहे, त्यामुळे काहीही होऊ शकतं’ असं जबाब सचिन सूर्यवंशी यांनी दिलाय.
तर, `मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो` असं स्पष्टीकरण मंगळवारी राम कदम यांनी दिलं होतं.
First Published: Wednesday, March 20, 2013, 08:43