Last Updated: Tuesday, March 19, 2013, 16:01
www.24taas.com,मुंबईआमदार क्षितिज ठाकूर यांनी विधान परिसर आवारात एका पोलिसाला मारहाण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे कमालीचे संतप्त झालेत. यामध्ये अन्य काही आमदारांचा हातही आहे.
पोलिसांवर कोणी हात उगारू नयेत. पोलिसांवर कुठेही हात उचलणं गैरच आहे. मनसे आमदारांने असं कृत्य केलं असेल तर त्याच्यावरही कारवाई व्हायला हवी, असंही राज ठाकरे म्हणालेत.
मनसे आमदार राम कदम यांनीही या पोलिसाला मारहाण केली आहे. त्यामुळे मनसेचे गटनेत बाळा नांदगावकर यांनी राम कदम यांना नोटीसही बजावली आहे. पोलीस मारहाणीमध्ये मनसे आमदार असल्याने मनसेही अडचणीत सापडली आहे. त्याच राज ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाचा आमदार असला तरी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.
सेवा बजावणाऱ्या पोलिसाला सर्वपक्षीय आमदारांनी चोप दिल्याने याचे पडसाद विधानसभेत उमटलेत. त्यामुळे विधानसभेचं कामकाजही तहकूब करण्यात आले आहे. आमदार क्षितिज ठाकूर, मनसे आमदार राम कदम यांच्यासह भाजपचे रावत यांचाही मारहणीत हात असल्याने आता काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
First Published: Tuesday, March 19, 2013, 15:48