Last Updated: Tuesday, March 19, 2013, 13:53
www.24taas.com, मुंबईँआमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
विधीमडंळात आवारातच पोलीस निरिक्षकाला मारहाण झाली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आमदारांनी पोलीस निरिक्षकाला मारहाण केल्याचे समजते आहे. आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपावरून सचिन सूर्यवंशी यांच्यावर थोड्यावेळापूर्वी हक्कभंग दाखल करण्यात आला होता.
विधिमंडळ आवारातच आमदार क्षितिज ठाकूर यांनी सचिन सुर्यवंशी यांना मारहाण केली. यामध्ये इतर तीन आमदारांनीही सूर्यवंशींना मारहाण केली असल्याचं समजते आहे.
First Published: Tuesday, March 19, 2013, 13:51