Last Updated: Thursday, December 6, 2012, 15:55
www.24taas.com, मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अनेक दिवसांची मागणी मार्गी लागली आहे. आता याबाबत श्रेयावरून लढाई करणं योग्य नसल्याचं पवार म्हणाले आहेत.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दादरच्या इंदू मिलच्या हस्तांतरणाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यसभेतमध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाची राज्यसभेत घोषणा केली होती तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांनी लोकसभेत ही घोषणा केली होती. महापरिनिर्वाण दिनापूर्वीच डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीच्या हस्तांतरणाची घोषणा झाल्यामुळे संसदेच्या बाहेर आणि इंदू मिल परिसरात एकच जल्लोष दिसून आला होता.
First Published: Thursday, December 6, 2012, 15:23