Last Updated: Monday, October 1, 2012, 19:12
www.24taas.com, साताराअकोले इथल्या भर सभेत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा फेकल्याचं सांगणारे अजितदादा आज मात्र काहीसे मवाळ झाल्याचं दिसलं. आपण राजीनामा फेकला, असं म्हणालोच नाही,
तर राजीनामा दिला असं म्हणालो, अशी सारवासारव आता अजितदादा करू लागले होते. काल काय बोललो, हे भलेही अजितदादा विसरले असतील. पण मीडियाच्या कॅमेराने मात्र ते काल काय बोलले आणि आज काय बोलले हे अचूक टिपलं होतं.
मात्र आता अजितदादा पुन्हा एकदा बॅकफूटवर गेले आहेत. मात्र मीडियाला त्यांनी चांगलेच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. अजितदादांनी मात्र त्यांच्यावर होणाऱ्या आरोपामुळे लवकरात लवकर सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.
First Published: Monday, October 1, 2012, 19:03