‘दादांच्या राजीनाम्याशी काँग्रेसचा संबंध नाही’, congress don`t relate with ajit pawar resignation

‘दादांच्या राजीनाम्याशी काँग्रेसचा संबंध नाही’

‘दादांच्या राजीनाम्याशी काँग्रेसचा संबंध नाही’
www.24taas.com, नवी मुंबई

नवी मुंबईत काँग्रेस पक्षातर्फे दोन दिवसीय प्रवक्ता शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी दुष्काळग्रस्तांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीशी काँग्रेसचा संबंध नसल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.

‘सूssss’ वचनांमुळे वादात अडकलेल्या दादांवर विरोधकांचा रोष कायम आहे. दादांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरलीय. पण, याबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागण्याची विरोधकांची भूमिका अयोग्य असल्याचं माणिकरावांनी म्हटलंय. अजित पवारांनी तीन वेळा माफी मागितली आहे. आता विरोधकांनी सभागृहाचं कामकाज थांबवू नये, असं आवाहन त्यांनी केलंय.

दुसरीकडे, अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ‘नो कमेंन्ट’ म्हणत भाष्य करण्याचं टाळलं.

First Published: Saturday, April 13, 2013, 10:02


comments powered by Disqus