सरकार-विरोधकांचे साटेलोटे, मनसेचा गंभीर आरोप, govt.-opposition setting in irrigation scam, mns blame

सरकार-विरोधकांचे साटेलोटे, मनसेचा गंभीर आरोप

सरकार-विरोधकांचे साटेलोटे, मनसेचा गंभीर आरोप
www.24taas.com, मुंबई
सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेली एसआयटी एक फार्स असल्याचा आरोप मनसेनं केलाय.

एसआयटी स्थापन करण्याआधी जलसिंचनाचे मोठे ठेकेदार भाजप खासदार अजय संचेती यांच्या घरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही सदस्यांची बैठक झाल्याची खळबळजनक माहिती मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी दिलीए.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी मनसे न्यायालयाल जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तर सिंचन घोटाळ्याच्या फौजदारी चौकशी करण्यासंदर्भात मनसे आमदार आग्रही आहेत.

सिंचन घोटाळ्या प्रकरणी आज मनसे आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या मागणीचं निवेदन सादर केलं. तर मनसेच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा भाजपचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केलाय.

First Published: Friday, December 28, 2012, 21:35


comments powered by Disqus