Last Updated: Saturday, December 22, 2012, 17:06
www.24taas.com, लंडन दक्षिण कोरियाची डान्स स्टाईल म्हणून फारच थोड्या वेळात प्रसिद्ध झालेल्या गन्गनम स्टाईलनं एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. गन्गनम स्टाईलचा व्हिडिओ आता असा व्हिडिओ आहे ज्याला यूट्यूबवर एक अरबपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय.
वृत्त वेबसाईट ‘बीबीसी डॉट को डॉट यूके’च्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ जुलै महिन्यात यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमुळे पॉप स्टार ‘पीएसवाय’ची चर्चा जगभर सुरू झाली. हाच व्हिडिओ आता ब्रिटिश सेना आणि थायलंडच्या नौसेनाद्वारे बनविल्या गेलेल्या व्हिडिओंचं प्रेरणास्थानदेखील बनलाय. ‘गुगल’च्या मते हा व्हिडिओला एका दिवसात जवळजवळ सत्तर लाख ते एक करोडपर्यंत हीटस् मिळालेत.
गन्गनम स्टाईलच्या व्हिडिओनं गायक जस्टिन बीबरच्या ‘बेबी’ या व्हिडिओचा रेकॉर्डही मोडीत काढलाय. यूट्यूबचे ट्रेंड प्रबंधक केविन एलोक्का यांच्या म्हणण्यानुसार, ‘पीएसवाय’च्या यशाचं रहस्य म्हणजे हे गाणं आणि त्यात घोड्याप्रमाणे केला जाणारा डान्स... यामुळे या गाण्यानं जगभरातील लोकांना थिरकण्सास भाग पाडलं.
First Published: Saturday, December 22, 2012, 17:05