रामनवमीपासून आकाशवाणीवर ‘गीतरामायण’, GEETRAMAYAN ON AAKASHWANI RADIO

रामनवमीपासून आकाशवाणीवर ‘गीतरामायण’

रामनवमीपासून आकाशवाणीवर ‘गीतरामायण’
www.24taas.com, मुंबई

आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी एक खुशखबर. १९ एप्रिलपासून म्हणजेच रामनवमीपासून आकाशवाणींच्या श्रोत्यांना ‘गीतरामायणा’चा आस्वाद पुन्हा एकदा घेता येणार आहे. ‘गीतरामायण’ हा श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेला कार्यक्रम पुन्हा एकदा प्रसारीत करण्याचा निर्णय आकाशवाणीनं घेतलाय.

१९५५ साली आकाशवाणीने ‘गीतरामायण’ प्रसारण सुरू केलं होतं. कवी गं. दि. माडगूळकर लिखित आणि सुधीर फडके यांच्या स्वरांनी सजलेलं ‘गीतरामायण’ रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यात यशस्वी ठरलं. ‘गीतरामायण’ या महाकाव्याला घराघरात पोहचवणाऱ्या रेडिओच्या माध्यमातून येत्या रामनवमीपासून ५२ आठवडे हा कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे.


आकाशवाणी केंद्राच्या सर्व केंद्रावरून ’गीतरामायण’ १९ एप्रिलपासून ५२ आठवडे सकाळी सव्वा सहा आणि साडे सहा यावेळेत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित होणार आहे.

First Published: Friday, April 12, 2013, 08:27


comments powered by Disqus