पाहा... `वाका वाका गर्ल` शकिराचा चिमुकला!, Shakira posts first photo of baby

पाहा... `वाका वाका गर्ल` शकिराचा चिमुकला!

पाहा... `वाका वाका गर्ल` शकिराचा चिमुकला!
www.24taas.com, मेड्रिड

कोलंबियाची गायिका शकीरा हिला नुकतीच पुत्ररत्नाची प्राप्ती झालीय. कसा दिसत असेल ‘वाका वाका गर्ल’ शकिराचा मुलगा ही अनेकांच्या लागून राहिलेली उत्सुकतेला पूर्णविराम देण्यासाठी शकिरानं आपल्या चिमुकल्याचा चेहरा पहिल्यांदाच ‘यूनिसेफ’च्या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांसमोर आणलाय.

आपल्या बाळाचा एक फोटो युनिसेफच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी शेअर केलाय. या फोटोत चिमुकल्या बाळासह त्याचा पिता आणि सॉकर खेळाडू गेराल्ड पीक दिसतोय. शकीरानं आपल्य ट्विटर पेजवर दोन ‘वेब पेजेस’ची माहिती दिलीय. यामध्ये पहिल्या पेजवर तिच्या चिमुकल्याचा हा फोटो आहे तर दुसरं पेजमध्ये आहे, गरिब मुलांना सहाय्यता मिळवून देण्यासाठी केलेला एक प्रयत्न... शकिरा आणि गेराल्ड यांनी अनाथ आणि गरिब मुलांना मदतीचा हात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं ‘यूनिसेफ’बरोबर ‘बेबी शॉवर’ योजना सुरू केलीय.

शकिरानं शेअर केलेल्या या फोटोत बार्सिलोनाचा फुटबॉल क्लबचा खेळाडू गेराल्ड पीकनं आपल्या मुलाला आपल्या कुशीत सामावलेलं आहे. या फोटोच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांनीही तिचं अभिनंदन केलंय.

First Published: Tuesday, February 5, 2013, 14:04


comments powered by Disqus