Last Updated: Thursday, January 24, 2013, 17:11
www.24taas.com, बार्सिलोनाआपल्या कमरेला मादक झटके देत ‘हिप्स डोंट लाय’ आणि ‘वाका वाका’ सारख्या गाण्यांवर सबंध जगाला पाय थिरकायला लावणाऱ्या शकीराने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. बार्सिलोना फुटबॉल टीमचा २५ वर्षीय खेळाडू आणि शकीराचा बॉयफ्रेंड जेरार्ड पिक हा या मुलाचा पिता आहे. या मुलाचं नाव शकीराने आणि जेरार्डने ‘मिलान’ असं ठेवलं आहे.
शकीराने आपल्या मुलाच्या नावाचा अर्थही घोषित केला आहे. स्लोवानिक भाषेत मिलानचा अर्थ लाडका आणि शालीन असा होतो. तर रोमन भाषेत त्याचा अर्थ चिकित्सक आणि मेहनती असा होतो. एवढंच नव्हे, तर संस्कृत भाषेचाही दाखला देत शकीरा म्हणाली, की मिलानचा संस्कृतमधील अर्थ भेट किंवा संयोग असा होतो.
३५ वर्षीय शकीराने मार्च २०१२मध्ये जेरार्डसोबत असलेल्या आपल्या संबंधांची माहिती जगाला दिली होती. सप्टेंबरमध्ये आपण गर्भवती असल्याचंही तिने सांगितलं होतंय यापूर्वी ती अर्जेंटिनाचे माजी राष्ट्राध्यक्ष फर्नांदो द ला रुआ यांचा मुलगा अंतोनियोसोबत ११ वर्षं राहात होती.
First Published: Thursday, January 24, 2013, 17:11