Last Updated: Monday, January 13, 2014, 16:22
www.24taas.com, झी मीडिया, संगमनेरप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलीच्या आत्महत्येचं दु:ख एका मुलाखतीत व्यक्त केलंय.
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथल्या आपल्या मुलाखतीत `माझं क्रियेशन असलेल्या मुलीनं स्वत:ला गोळी घालून घेतली. ती गोळी तिनं तिला नव्हे तर मला घातली. काळजात रुतलेली ही गोळी आजही निघालेली नाही` अशा शब्दात आशाताईंनी आपलं दुख व्यक्त केलं.
आपल्या मुलीच्या आत्महत्येचं दु:ख सुरांबरोबर व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले. ‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले...’ या गीतानं त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Monday, January 13, 2014, 16:22