Last Updated: Tuesday, December 6, 2011, 03:14
झी २४ तास वेब टीम, चिंचवड अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार शंकर महादेवन यांना प्रदान करण्यात आला. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या हस्ते शंकर महादेवन यांना हा पुरस्कार देण्यात आला. चिंचवडमध्ये हा कार्यक्रम थाटात संपन्न झाला.
आपल्याला या पूर्वी अनेक पुरस्कार मिळालेत. पण हा पुरस्कार मात्र इतर सर्व पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे. तसंच या पुरस्काराचे महत्त्व वेगळं असल्याची भावना शंकर महादेवन यांनी व्यक्त केली. आशा भोसलेंच्या नावाचा हा पुरस्कार आपल्याला मिळेल आणि तो ही साक्षात् पं. हृदयनाथ मंगेशकरांकडून, याची आपण कधी कल्पनाही केली नव्हती. असं शंकर महादेवन या प्रसंगी आपल्या भाषणात म्हणाले.
सारेगमपच्या दहाव्या पर्वातील गायक धवल चांदवडकर व इतर काही गायकांनी याप्रसंगी शंकर महादेवन यांची काही गाणी सादर केली. रसिकांनी या कार्यक्रमाला चांगलीच गर्दी केली होती.
First Published: Tuesday, December 6, 2011, 03:14