Last Updated: Tuesday, February 14, 2012, 16:04
www.24taas.com, अलीगढ़ सुप्रसिद्ध उर्दू शायर आणि गीतकार अखलाक मोहम्मद शहरयार यांचं सोमवारी निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते.
त्यांच्या कुटुंबातील सूत्रांनी सांगितलं की शहरयार यांना फुप्फुसांचा कॅन्सर झाला होता. सोमवारी संध्याकाळी साधारण ५ च्या सुमारास त्यांचं अलीगढ येथील आपल्या निवासस्थानी निधन झालं. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
मूळचे बरेलीच्या आंवला येथील निवासी असणाऱ्या शहरयार यांना २००८ साली साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जाणार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता. मुख्यमंत्री मायावती तसंच राज्यपाल बी एल जोशी यांनी शहरयार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
शहरयार यांचे ६ हून अधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. याशिवाय त्यांना 'उमराव जान', 'गमन', 'अंजुमन' इ. अनेक चित्रपटांची गीतं लिही आहेत. ते 'आलीगढ़ युनिव्हर्सिटी'मध्ये उर्दूचे प्राध्यापक आणि उर्दूचे विभागाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या ‘ख्वाब का दर बंद है’, ‘शाम होनेवाली है’, ‘मिलता रहुंगा ख्वाब में’ या कविता गाजल्या आहेत. 'उमराव जान'मधील 'इन आँखों की मस्ती के', 'दिल चिज क्या है...', 'गमन'मधील 'सीने में जलन...' ही गीते विशेष गाजली होती.
काल दुपारी शहरयार यांच्या पार्थिवाचा दफनविधी करण्यात आला.
First Published: Tuesday, February 14, 2012, 16:04