वर्ध्यात खाजगी बसला आग, 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Last Updated: Thursday, May 29, 2014, 17:12

जळगावहून नागपूरला येणाऱ्या बाबा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळ अचानक आग लागली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

ए आर रेहमान यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 10:21

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या घरावर नुकताच काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचं समोर आलंय. खुद्द रेहमान यांनीही ट्विटरवरून या हल्ल्याचं चित्र आपल्या चाहत्यांशी शेअर केलंय.

`गानकोकिळे`च्या आवाजातलं सुफी संगीत!

Last Updated: Thursday, May 8, 2014, 16:28

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मधूर कंठातून गाण्यांचे विविध प्रकार तुम्ही आत्तापर्यंत ऐकले असतील... पण, या कोकिळेनं पहिल्यांदाच सुफी संगीताला आपला आवाज दिलाय... त्यामुळे लतादीदींच्या आवाजातून तुम्हाला सुफी संगीत ऐकायला मिळणार आहे.

सलमान-संगीताचा `विकेन्ड प्लान` फुटला

Last Updated: Thursday, May 1, 2014, 19:30

आपल्या संबंधांबद्दल अनेकदा चर्चेत येणारा अभिनेता सलमान खान आता पुन्हा चर्चेत आलाय तो त्याच्या भूतकाळातील संबंध वर्तमानकाळात आल्यानं...

`क्रिकेटर` श्रीसंत लागला `धंद्याला`...

Last Updated: Thursday, May 1, 2014, 18:13

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण उजेडात येण्यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात श्रीसंतला ठुमक ठुमक नाचताना पाहिलाच असेल... पण, आता मात्र त्याच्या फॅन्सला (उरल्या-सुरलेल्या) त्याला सिनेमात अभिनय करताना पाहता येणार नाही. एव्हढंच नाही तर श्रीसंत एका सिनेमासाठी म्युझिकही तयार करणार आहे.

गीतकार गुलजार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

Last Updated: Saturday, April 12, 2014, 18:31

ज्येष्ठ गीतकार गुलजार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय. सिनेक्षेत्रातल्या या सर्वोच्च पुरस्कारानं गुलजार यांचा गौरव करण्यात आलाय. संवेदनशील आणि तरल कवी अशी ओळख असणा-या गुलजारांना आज दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.

संगीतकार नंदू भेंडे यांचे निधन

Last Updated: Friday, April 11, 2014, 17:48

संगीतकार नंदू भेंडे यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते 61 वर्षांते होते. त्यांच्या पश्चात्य पत्नी, दोन मुलगे आणि वडील असा परिवार आहे.

कवी-गीतकार सुधीर मोघे यांचं निधन

Last Updated: Saturday, March 15, 2014, 15:30

ज्येष्ठ कवी - गीतकार सुधीर मोघे यांचं पुण्यात निधन झालंय. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळतनकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव अशा सुमारे ५० हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखनाचं काम केलंय.

लतादीदी `ए मेरे वतन ` गीत गाणार नाहीत?

Last Updated: Monday, January 27, 2014, 18:29

मुंबईत आज संध्याकाळी महालक्ष्मी रेसकोर्सवर `ए मेरे वतन के लोगो ` हा  भव्यदिव्य कार्यक्रम होतोयं. सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरीक `ए मेरे वतन के लोगो `  हे गीत गाणार आहेत.

रेसकोर्सवर घुमणार लतादीदींचे स्वर!

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:40

मुंबईत आज महालक्ष्मी रेसकोर्सवर `ए मेरे वतन के लोगो` हा भव्यदिव्य कार्यक्रम होत आहे. सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरीक `ए मेरे वतन के लोगो` हे गीत गाणार आहेत. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आणि नरेंद्र मोदी ह्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. सोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुध्दा यावेळी उपस्थिती लावणार आहेत.

`धूम ३`चं `मलंग` वादाच्या भोवऱ्यात

Last Updated: Friday, December 13, 2013, 18:03

आपल्या आयुष्यातील ३० वर्ष ज्यांनी गाणी लिहिण्यात घालवली असे गीतकार समीर अनजान हे `धूम ३`मधील `मलंग` गाण्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मदारिया सुफी समुदायानं आमीर खान, कतरिना कैफ, निर्माता यशराज फिल्म्स आणि गीतकार समीर अनजान यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या गाण्यामुळं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मी महिलांचा अपमान करीत नाही – रॅप सिंगर हनी सिंग

Last Updated: Friday, December 6, 2013, 21:42

आपल्यावर नेहमी महिलांचा अपमान करतो, असा आरोप होत आहे. मात्र, मी रॅप गाण्यातून महिलांचा अपमान करीत नाही, असे स्पष्टीकरण जगप्रसिद्ध रॅप गायक हनी सिंग याने दिले आहे.

सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची तिकीट विक्री

Last Updated: Thursday, December 5, 2013, 21:46

सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची तिकीट विक्री सुरू झाली आहे. पुण्यात तिकिटांसाठी रात्रीपासूनच रसिकांच्या रांगा लागल्या आहेत.

यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार महेश एलकुंचवारांना प्रदान

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 08:26

संगीत नाटकं जशीच्या तशी सादर करण्याऐवजी बदलत्या सामाजिक चौकटीनुसार नाटकातसुद्धा बदल करावाच लागेल असं मत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केलंय.

ठाण्यात दिवाळीतली संगीतमय सांस्कृतिक मेजवानी

Last Updated: Saturday, November 2, 2013, 10:34

राज्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. दिवाळीतली ही संगीतमय सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला नागरिक उत्सुक असतात. ठाण्यातही गडकरी रंगायतनमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम पार पडला.

संगीतात वेदना शमवण्याची ताकद

Last Updated: Saturday, October 26, 2013, 22:43

वेदनांपासून आराम हवाय? तर ऐका संगीत... छोट्यातल्या छोट्या वेदनेपासून आराम देण्याचं सामर्थ्य संगीतात असल्याचं नुकत्याच एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. संगीत ऐकल्यामुळे दहापैकी किमान चार लोकांना दीर्घकालीन वेदनेपासून आराम मिळत असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे.

अदनान सामी आत्ताच भारत सोडून जाणार नाही!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 16:48

गृह मंत्रालयानं पाकिस्तानी गायक-संगीतकार अदनान सामीच्या भारतीय व्हिजाचा कालावधी वाढवून दिलाय. अदनानला आता आणखी तीन महिने भारतात राहण्याची परवानगी दिली गेलीय.

अदनान सामीने देश सोडावा; मनसेची मागणी

Last Updated: Saturday, October 12, 2013, 21:49

पाकिस्तानी गायक - संगीतकार अदनान सामीने देश सोडावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलीय.

अदनान सामीचा विसा संपला, तरीही सामी भारतातच!

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 14:56

संगीतकार गायक अदनान सामी आणि त्याची पत्नी सबाह गालादरी यांच्यातल्या वादानं आता नवं वळण घेतलंय. अदनान सामीचा विसा संपलाय. तरीही तो अजून भारतात राहात आहे असं तपासात आढळून आलंय.

विरोध धुडकावत काश्मीरमध्ये निनादले संगीताचे सूर!

Last Updated: Saturday, September 7, 2013, 19:51

हुरीयतच्या धमकीला भीक न घालता भारतीय वंशाचे जगप्रसिद्ध संगीतकार जुबिन मेहता आज (शनिवारी) काश्मीर खोऱ्यात आपल्या संगीताच्या माध्यमातून शांतीचं आवाहन करणार आहेत.

श्रीकृष्णानं सांगितलेल्या या सफलतेच्या गोष्टी...

Last Updated: Thursday, August 29, 2013, 08:26

भगदवदगीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णानं केलेलं विविचन हे युवकांसाठी आजच्या काळातही तंतोतंत लागू ठरतं, असं कित्येकांचं म्हणणं आहे.

गुलजार यांचे ७९ व्या वर्षात पर्दापण

Last Updated: Sunday, August 18, 2013, 18:22

बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज ७९ वा जन्मदिवस आहे. गुलजार यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... खूप कमी लोकांना त्याचे खरं नाव माहित आहे. त्यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे.

ए. आर. रहेमान बनवणार हिंदी चित्रपट!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 20:29

संगीतकार, गायक आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेला ऑस्कर पुरस्कार विजेता ए. आर. रेहमान आता एक हिंदी चित्रपट बनवणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची कथाही रेहमान स्वत: लिहीणार आहेत.

आता मदरशांमध्ये शिकवावी लागणार भगवद् गीता!

Last Updated: Monday, August 5, 2013, 16:11

मध्य प्रदेशात शिवराज यांच्या सरकारवर हिंदुत्व प्रसाराचे आरोप होत असतानाच सरकारच्या नव्या निर्णयामुळे वाद उठला आहे. यापुढे मध्य प्रदेशातील मदरशांमध्येही भगवद् गीता शिकवणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

‘मुझको मेरे बाद जमाना ढुंढेगा’

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 12:38

३१ जुलै १९८० साली म्हणजेच बरोबर तेहत्तीस वर्षापूर्वी हिंदी चित्रपट संगीतातलं एक पर्व संपलं... कारण, या दिवशी मोहम्मद रफी यांनी या जगाचा निरोप घेतला होता. रफींची जागा आजतागायत कुणीही घेऊ शकलं नाही.

हरभजन सिंगची गर्लफ्रेंड गीता बसरा प्रेग्नंट

Last Updated: Tuesday, July 9, 2013, 13:10

भारतीय क्रिकेटर ऑफ स्पिनर हरभजन सिंग याची मैत्रिण गीता बसरा प्रेग्नंट आहे. तुमचा विश्वास बसत नाही ना, मात्र, ही घटना खरी आहे. मात्र, ही नेहमीच्या जीवनातील गोष्ट नाही. ती आहे, सिनेमातील. तिच्या आगामी सिनेमात गरोदर महिलेची गीता भूमिका करीत आहे.

संगीत आणि हृदयाचं नातं अतूट...

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 07:55

संगीताला ईश्वराचा दर्जा दिला गेलाय. सात कोमल स्वरांच्या माध्यामातून मन प्रसन्न करण्याचं हे एक तंत्र आहे. शरीर आणि मनाच्या आनंदी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे योगाचा वापर केला जातो तसंच संगीत आपल्या आत्म्याला आनंदी ठेवण्याचं काम करतं.

गुगलवर गाणी ऐकण्याची नवी सोय: गुगल प्ले

Last Updated: Monday, May 20, 2013, 18:48

इंटरनेटवर अनेक वेबसाइट्सवर सिनेमाची गाणी ऐकली जातात, तसंच डाऊनलोड करता येतात. विशेष करून यासाठी यूट्युबचा वापर जास्त केला जातो. मात्र आता गुगलवरच गाणी ऐकण्याची सोय करण्यात आली आहे.

‘वंदे मातरम’ इस्लामविरोधी, खासदारानं केला अवमान

Last Updated: Thursday, May 9, 2013, 12:08

लोकसभेत ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत सुरू झाल्या झाल्या बसपा खासदार शफीकुर्र रेहमान बर्क यांनी लोकसभेतून काढता पाय घेतला.

रामनवमीपासून आकाशवाणीवर ‘गीतरामायण’

Last Updated: Friday, April 12, 2013, 10:20

आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी एक खुशखबर. १९ एप्रिल रामनवमीपासून आकाशवाणींच्या श्रोत्यांना ‘गीतरामायणा’चा अस्वाद घेता येणार आहे. रामनवमीपासून ‘गीतरामायण’ पुन्हा प्रसारीत करण्याचा आकशवाणीने निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेत मनसेला धक्का

Last Updated: Thursday, March 14, 2013, 19:57

मुंबई महापालिकेतील मनसे नगरसेविका गीता बाळा चव्हाण वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांचे नगरसेवक पद राहणार की जाणार याचीच चर्चा आता सुरू झाली आहे.

`गीतिका`च्या आईची आत्महत्या; कांडाच जबाबदार!

Last Updated: Saturday, February 16, 2013, 13:08

एअर होस्टेस गीतिका शर्मा प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. शुक्रवारी गितीकाच्या आईनं – अनुराधा शर्मा यांनी - राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलीय.

यापुढे गाणं बंद, पण आम्हाला एकटं सोडा - प्रगाश

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 13:17

श्रीनगरच्या एकमेव मुलींच्या रॉक बॅन्डनं आता यापुढे कधीच गाणं न गाण्याचा निर्णय घेतलाय. सध्या भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या या मुलींनी कट्टर धर्मियांच्या धमक्यांपुढे नमतं घेत ‘आम्ही यापुढे कधीच गाणार नाही पण आम्हाला एकटं सोडा’ अशी विनवणी केलीय.

`गीतिकासोबत त्याला` फक्त हवे होते शारीरिक संबंध

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 13:41

पूर्व एअर हॉस्टेस गीतिका शर्मा आत्महत्येप्रकरणी एक नवचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात एक आरोपी अरूण चड्ढा ने सांगितले आहे की, गीतिकासोबत शारीरिक संबंधच गोपाळ कांडाला ठेवयाचे होते.

सैफने संगीत कार्यक्रमात करीनाला दिलं चुंबन

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 20:03

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल म्हणजे `सैफिना` आज ते दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले खरे.. मात्र संगीत कार्यक्रमात ते दोघंही एकमेकांशिवाय राहू शकले नाही.

करीनाच्या संगीत सोहळ्याला अमृता सिंग उपस्थित!

Last Updated: Monday, October 15, 2012, 18:53

करीनाच्या संगीत सोहळ्यालाच जवळपास अर्धं बॉलिवूड उपस्थित होतं. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडचे तमाम कलाकार तर उपस्थित होतेच, पण आश्चर्य म्हणजे या प्रसंगी सैफ अली खानची पूर्व पत्नी अभिनेत्री अमृता सिंगदेखील उपस्थित होती.

संगीत सोहळ्यात थिरकली बिनधास्त बेबो…

Last Updated: Monday, October 15, 2012, 16:27

‘सैफीना’... सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नघटीकेसाठी केवळ काही तास उरलेत. त्याअगोदर रविवारी करीनाच्या घरी एका संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या संगीत सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी सामील झाले होते.

गोपाल कांडाचं महिला`कांड`!

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 12:31

गीतिका शर्माच्या आत्महत्याप्रकरणात महिला आय़ोगाकडील माहितीनुसार गीतिकावर अनैसर्गिक पद्धतीचं लैंगिक शोषण झालं असल्याची माहिती पुढे आली आहे.याशिवाय गोपाल कांडा आंबटशौकीनपणाची माहितीही समोर येत आहे.कांडाच्या इतरही अनेक गैरबाबी पोलिस तपासणीत पुढे आल्या आहेत.

गोपाळ कांडाची शरणागती

Last Updated: Saturday, August 18, 2012, 08:05

एअरहोस्टेस गीतिका शर्मा आत्महत्याप्रकरणी आरोपी आणि हरियाणाचा माजी मंत्री गोपाळ कांडाने दिल्लीच्या अशोक विहार पोलिस ठाण्यात पहाटे 4च्या सुमारास सुमारास सरेंडर केलंय.

आता नाटकांपूर्वीही राष्ट्रगीत

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 15:43

नाट्यगृहांमध्ये आता तिस-या घंटेबरोबर राष्ट्रगीताचे सूरही घुमणार आहेत. याची सुरुवात स्वातंत्र्यदिनानिमित्तानं पुण्यात झाली. प्रशांत दामलेंच्या सासू माझी ढासू या नाटकाच्या प्रयोगाआधी राष्ट्रगीत झालं आणि त्यानंतर नाटकाला सुरुवात झाली.

माजी मंत्र्यांच्या ‘काम’गिरीमुळे गीतिकाची आत्महत्या

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 13:28

एमडीएलआर कंपनीची एअरहॉस्टेस गीतिका शर्माच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत.

‘क्युरिओसिटी’तून पहिला रंगीत फोटो

Last Updated: Thursday, August 9, 2012, 05:42

नासानं मंगळावर पाठवलेल्या क्युरिओसिटीनं पाठवलेला पहिला रंगीत फोटो आणि एक व्हिडिओ नासाच्या शास्त्रज्ञांना मिळालाय. यामुळे शास्त्रज्ञांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांचं निधन

Last Updated: Monday, July 30, 2012, 11:53

ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांचं निधन झालं आहे. सांगलीतल्या राहत्या घरी अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. जवळपास १५० हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे.

महापौरांच्या आधी, कुत्र्यांसाठी वाहन खरेदी

Last Updated: Saturday, July 28, 2012, 17:27

चंद्रपूर मनपातील वातावरण सध्या तापलंय. पण ही गरमागरमी राजकीय कारणावरून नाही तर ती आहे कुत्र्यांवरून. शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या संख्येत भरमसाठ वाढ झालीय. महापौरांनी कुत्रे पकडण्यासाठी नव्या वाहन खरेदीचे आदेश दिले.

वाशी येथे संगीत रजनी कार्यक्रम

Last Updated: Thursday, June 28, 2012, 17:33

म्युझिक लिबरेशन युनियन संस्था. गेली नऊ वर्ष संगीताचा ध्यास घेऊन अभ्यास करताना संगीताचा प्रसार करीत आहे. या संस्थेच्या दहाव्या स्थापना दिनानिमित्ताने नवी मुंबईत वाशीमधील मराठी साहित्य मंदिर येथे संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दि. ३० जून रोजी सायंकाळी ३ ते ७ या वेळेत होणार आहे.

मंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यू

Last Updated: Thursday, June 21, 2012, 22:56

मंत्रालयातील आगीत तीघांचा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर हे दोन मृतदेह सापडले असून अजून त्यांची ओळख पटलेली नाही. तर तिसरा व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मंत्रालयाचा विमाच नाही!

Last Updated: Friday, June 22, 2012, 07:22

महाराष्ट्रातील अनेक मोठ्या प्रकल्पांचे आणि प्रकरणांची कागदपत्र असणाऱ्या मंत्रालयाला आज दुपारी आग लागली. या आगीत अनेक कागदपत्रे खाक झाली. अनेक मोठ्या वास्तूंचा आणि त्यातील वस्तूंचा विमा उतरविला जातो. परंतु, मंत्रालयाचा विमाच उतरविला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

LIVE : सिक्युरिटी-फायर ऑडिट झालंच नव्हतं...

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:40

मंत्रालयाला लागलेल्या आगीबाबत आता नवानवा खुलासा होताना दिसतोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचं सिक्युरिटी आणि फायर ऑडिट झालंच नव्हतं असं समजतंय. तसंच तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत आणि त्यामुळेच आगीनं उग्र स्वरुपाचं रुप धारण केलं, हेही आता स्पष्ट झालंय.

'आदर्श'ची कागदपत्रे सुरक्षित?

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:38

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला आज दुपारी लागलेल्या आगीत वादग्रस्त आदर्श सोसायटीचे कागदपत्रही जळाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

मंत्रालयाच्या आगीत २४ जण गंभीर जखमी

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:40

मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.

केज निवडणूक: संगीताची सांगता, 'पृथ्वी'चे राज

Last Updated: Saturday, June 16, 2012, 12:47

बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे आणि भाजपच्या संगीता ठोंबरे यांच्यात सरळ लढत असल्याचं दिसून येतंय. १२ व्या फेरीअखेर पृथ्वीराज साठे जवळजवळ ५५०० मतांनी आघाडीवर आहेत.

सलमान लावतोय अजहरुद्दिनच्या संसाराला सुरूंग!

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 08:43

सलमान खानने आपल्या एकेकाळच्या गर्लफ्रेंडबरोबर पुन्हा एकदा रोमांस करायला सुरूवात केली आहे. सलमानची ही माजी गर्लफ्रेंड आहे संगीता बिजलानी. मुख्य म्हणजे संगीता बिजलानी माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस खासदार मोहम्मद अजहरुद्दिन याची पत्नी आहे.

भज्जी -गीता लवकरच विवाह बंधनात

Last Updated: Thursday, May 24, 2012, 11:26

टीम इंडियाचा स्पिनर आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हरभजन सिंग लवकरच मॉडेल अभिनेत्री गीता बसरा हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे.सप्टेंबरमध्ये आपण विवाहबद्ध होणार असल्याचे स्वत: भज्जीनेच सांगितलं आहे.

माणिक वर्मा : संगीतातला माणिक मोती

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 15:37

प्रसिध्द शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांची आज जयंती आहे माणिक वर्मा यांच्या आरस्पानी स्वराने संगीत क्षेत्रात नवी पहाट झाली.....आपल्या अवीट स्वरांनी संगीतप्रेमींचं जीवन समृध्द करणा-या माणिक ताईंना आमचे शतश: प्रणाम.

आगीत लाखो रूपयाची मालमत्ता भस्मसात

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 16:24

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातल्या कोल्हार भगवतीपूरमध्ये लागलेल्या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. या आगीत ६ दुकानं भक्षस्थानी पडली असून कुठलीही जीवित हानी मात्र झालेली नाही.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला भीषण आग

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 13:34

नाशिकमध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीतल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला भीषण आग लागलीय. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीनं प्रयत्न सुरू आहेत.

औरंगाबाद आगीत ३२ टपऱ्या खाक

Last Updated: Saturday, May 5, 2012, 13:05

औरंगाबादच्या मुकुंदवाडी चौकातील पीव्हीआर थिएटरजवळ मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीत 32 टप-या आगीच्या भक्षस्थानी पडल्यात. आग इतकी भीषण होती की अगदी तासाभरातच या टप-या बेचिराख झाल्या.

रुग्णांसाठी संगीत आरोग्यदायी

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 10:56

जे संगीत आपल्याला आवडते, ते संगीत ऐकल्यावर आपण आनंदीत होतो. शिवाय ताजेतवाणे होतो. मन प्रसन्न राहते. आपल्याला आलेले टेन्शनही दूर होते. थोडक्यात काय, संगीताचे अनेक फायदे, लाभ आहेत. आता संशोधनातून असेही पुढे आले आहे की, संगीत ऐकल्याने रूग्णांसाठी आरोग्यदायी ठरते. रूग्णाने संगीत ऐकल्याने त्याला आजाराच्या तणावातून मुक्तता मिळले.

कुस्तीगीर गीताने इतिहास घडवला

Last Updated: Monday, April 2, 2012, 08:57

गीताने रविवारी इतिहास घडवला आहे. गीता ऑलिंपीकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला कुस्तीगीर ठरली. कझाकिस्तान इथल्या आशियाई पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत धडक मारत गीता ऑलिंपीकसाठी पात्र ठरली आहे.

भगवतगीता : रशियात बंदी याचिका फेटाळली

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 12:10

भारतातील हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवतगीतेवर बंदी घातली जावी या मागणीने गेले काही दिवस रशियात जोर धरला होता. 'भगवद्‌गीता' हे 'अतिरेकी' साहित्य असल्याचा दावा करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरचा निकाल रशियातील न्यायालयाने फेटाळला. सायबेरियातील टॉम्स्क येथील न्यायालयात हा खटला सुरू आहे.

आरक्षण : महिलांना 'पदां'चे राजकीय 'गाजर'

Last Updated: Thursday, March 8, 2012, 16:16

मुंबई महापालिकेत १२१ महिला निवडून आल्या आहेत. महिला नगरसेवकांचं संख्याबळ जास्त असलं तरी शिवसेना-भाजप युतीनीच नाही तर कॉंग्रसे- राष्ट्रवादी पक्षानी महापौर, स्थायी समिती,सभागृह नेता अथवा विरोधी पक्ष नेत्याची उमेदवारी महिला नगरसेवकांना दिलेली नाही.

संगीतातील 'रवी'चा अस्त

Last Updated: Thursday, March 8, 2012, 12:41

ख्यातनाम संगीत दिग्दर्शक रवी शंकर शर्मा यांचे निधन झालं. हिंदी सिनेसृष्टीत रवी या नावाने ते ओळखले जात. रवी यांचे बुधवारी रात्री त्यांच्या सांताक्रुझ येथील निवासस्थानी निधन झालं ते ८६ वर्षांचे होते.

सीता और गीताची ड्रीम गर्ल... कतरीना

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 08:26

सीता और गीता हा सिनेमा म्हणजे हेमा मालिनीच्या करिअर मधला मैलाचा दगड. सोशिक सीता आणि चलाख गीता या दोन्ही भूमिका हेमामालिनींनं अगदी चपखल वठवल्या. संजीव कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासह तिचं जमलेलं ट्युनिंग त्यावेळी प्रेक्षकांना भलतच आवडलं.

महापौरांची खुर्ची की, संगीतखुर्ची?

Last Updated: Saturday, February 25, 2012, 20:19

पुण्यात महापौरपदाची संगीतखुर्ची रंगण्याची शक्यता आहे. शहराचं महापौरपद ४ जणींना सव्वा-सव्वा वर्षांसाठी विभागून देण्याचा विचार पक्षातर्फे होऊ शकतो अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

आपलं राष्ट्रगीत 'गिनीज बुकात'

Last Updated: Saturday, February 25, 2012, 18:21

ठाण्यात राष्ट्रगीताच्या समुहगानाचा विक्रम झाला आहे. ठाण्यामधील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ७० हजार जणांनी एकाच वेळी राष्ट्रगीत म्हटले आहे.

राष्ट्रगीत गाऊया, चला एकजूट दावूया....

Last Updated: Saturday, February 25, 2012, 16:26

राष्ट्रगीताच्या शताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात राष्ट्रगीताच्या समुहगानाचा विक्रम घडणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ५० हजार नागरिक जन-गण-मन हे राष्ट्रगीत गाणार आहेत.

'गुलजार'अन् 'कविता'ला मतदान नाकारले

Last Updated: Thursday, February 16, 2012, 16:57

प्रसिध्द ज्येष्ठ गीतकार गुलजार यांचे मुंबईतील मतदान यादीतून नाव गायब झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही. तर ठाण्यात पूर्वी राहणारी मात्र, लग्नानंतर मुंबईकर झालेली अभिनेत्री कविता लाड-मेढेकर हिला मतदानापासून रोखण्यात आले.

उर्दू शायर गीतकार शहरयार यांचे निधन

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 16:04

शहरयार यांचे ६ हून अधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी लिहीलेली 'उमराव जान'मधील 'इन आँखों की मस्ती के'..., 'दिल चिज क्या है...', 'गमन'मधील 'सीने में जलन...' ही गीते विशेष गाजली होती.

ए. आर. रेहमानच्या शिरपेचात मानाचा तुरा

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 08:54

प्रसिध्द संगीतकार ए. आर. रेहमानबरोबर जर्मन ऑर्केस्ट्रा कार्यक्रम करणार आहे. त्यामुळे रेहमानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जर्मनी फिल्म बेबल्सबर्ग ऑर्केस्ट्रा रेहमानला मानवंदना देणार आहे आणि तिही त्याच्याच गाण्यांनी.

सांगलीमध्ये अविष्कार संगीत महोत्सव

Last Updated: Saturday, January 7, 2012, 19:58

दहाव्या अविष्कार संगीत महोत्सवाला सांगलीतल्या इस्लामपुरमध्ये सुरूवात झाली आहे. ‘साईज झिरो’ अर्थात परफेक्ट फ्युजन या तालवाद्य आणि नृत्याच्या कार्यक्रमानं या महोत्सवाची सुरूवात झाली.

'रशियात भगवतगीता', कोणी रोखेल का 'आता'

Last Updated: Thursday, December 29, 2011, 18:42

भारतातील हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवतगीतेवर बंदी घातली जावी या मागणीने गेले काही दिवस रशियात जोर धरला होता. पण आता रशियात सायबेरियामधील न्यायालयाने भगवदगीतेवर बंदी लावण्याचा मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.

राष्ट्रगीताची शतकपूर्ती

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 13:55

ज्यादिवशी अण्णांची भ्रष्टाचार विरोधी चळवळ ऐतिहासिक वळण घेत होती, त्याच दिवशी योगायोगाने आपलं राष्ट्रगीताने शतक गाठलं. ‘जन गण मन’या भारतीय राष्ट्रगीताला काल २७ डिसेंबर रोजी १०० वर्षं पूर्ण झाली.

भगवद्‌गीतेचा अवमान; रशियाची सारवासारव

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 08:24

रशियातील न्यायालयात भगवद्‌गीतेचा अवमान झाल्याप्रकरणी भारतात वातावरण तापले. भारताचा जिवलग मित्र रशियाने भगवद्‌गीतेप्रकरणी सारवासारव सुरू केली आहे.

भगवतगीतेवर बंदी आक्षेपार्ह - बाबा रामदेव

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 07:12

उपनिषद, वेद आणि धर्मग्रंथांमधून दिलेलें ज्ञान विश्वकल्याणासाठी आहे. त्यावर बंदीचा विचार हा आक्षेपार्ह असल्याची टीका बाबा रामदेव यांनी केली आहे.

एका ज्ञान तपस्वीचा गौरव

Last Updated: Thursday, December 22, 2011, 20:08

संगीत नाटक अकादमीने डॉ.रा.चि.ढेरे यांना टागोर अकादमी पुरस्कार जाहीर केला आहे. असामान्य प्रतिभेचे वरदान लाभलेल्या डॉ.रा.चि.ढेरे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संत साहित्य, ग्राम दैवते, भक्ती संप्रदाय, धार्मिक स्थळं, लोक साहित्य, लोक कलेच्या संशोधनात आणि लेखनात व्यतित केलं आहे

संगीत मानापमान नाटक पुन्हा रंगभूमीवर

Last Updated: Friday, December 16, 2011, 03:59

बालगंधर्वांनी अजरामर केलेलं संगीत मानापमान हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येतंय. शंभर वर्षांपूर्वी हे नाटक लिहिलं गेलं होतं. हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी राहुल देशपांडेंनी पुढाकार घेतलाय. येत्या अठरा तारखेला संगीत मानापमानचा पहिला प्रयोग पुण्यात होणार आहे.

वर्ध्याच्या कलामहोत्सवात गीतगायन

Last Updated: Friday, December 16, 2011, 13:04

वर्धा कला महोत्सवातील गीतगायन स्पर्धेत प्रथम मराठी फिल्मी गीत तसेच सुफी संगीत वा फिल्मी नॉन फिल्मी वा भक्तीगीत यापैकी एक तसेच परीक्षकांच्या निवडीचे एक गीत गायकांनी सुरेल आवाजात सादर केले.

'गंधर्वा'विना सवाई गंधर्व संगीत महोत्सव

Last Updated: Monday, November 7, 2011, 05:56

पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचं सात ते ११ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आलयं. संगीत महोत्सवाचं हे ५९ वं वर्ष आहे. पंडित भीमसेन जोशींना हा महोत्सव समर्पित असणार आहे. त्यांच्य़ा मृत्यूनंतर हा पहिलाच सवाई गंधर्व महोत्सव आहे.

गायक ते महागायक... एक प्रवास

Last Updated: Sunday, October 30, 2011, 13:05

विश्वजीत बोरवणकर
‘आयडिया सारेगमप पर्व-१०’चा महागायक
या ब्लॉगच्या माध्यमातून जर साधारण माझ्या वयाच्या किंवा माझ्याहून लहान मित्रांना त्यांचा या क्षेत्रातला एक मित्र म्हणून काही टिप्स देऊ शकलो, तर मला वाटतं की जे काम माझे गुरूजन करत आले आहेत त्यात माझ्यापरीने मी ही हातभार लावला आहे.