रंगेल पूनमच्या होळीचे 'यूट्युब'ने उडवले रंग - Marathi News 24taas.com

रंगेल पूनमच्या होळीचे 'यूट्युब'ने उडवले रंग

www.24taas.com, मुंबई
 
इंटरनेट सेंसेशन पूनम पांडेला खरं तर आपल्या फॅन्सना ‘आपल्या’च रंगात रंगवून टाकायची फार इच्छा होती. त्यासाठी तिने होळी स्पेशल व्हिडिओदेखील प्रदर्शित केला. पण, यूट्युबने मात्र या व्हिडिओला अश्लील ठरवून पूनमच्या इच्छेवर पाणी फिरवलं.
 
या व्हिडिओत पूनम पांडे पूनम वेगवेगळ्या रंगांनी भिजून गेली आहे. हातात ‘भांग’ भरलेला पेला घेऊन अंगावरचे कपडे उतरवत अत्यंत उत्तेजक हावभाव केले होते. पण, यामध्ये ती उन्मादक कमी आणि बावळटच जास्त वाटत होती. यूट्युबने मात्र या व्हिडिओला अश्लील असल्याच्या कारणाने आक्षेपार्ह ठरवत आपल्या वेबसाइटवरून काढून टाकला.
 
पूनमने आपल्या व्हिडिओची घोषणा करत ट्विटरवर लिहीलं होतं, “वॉर्नंग- १८ आणि त्याखालील वयाच्या मुलांनी हा व्हिडिओ पाहू नका. लहान वयातील मुलांनी हा व्हिडिओ पाहिल्यास ही जबाबदारी माझी नाही. #DirtyPlayofPoonamPandey
 
“DirtyPlayofPoonamPandey ट्वीटहार्ट्स !! मी होळीच्यच दिवशी जन्मले होते. यावर्षी ११ मार्चला मी २० वर्षांची होणार आहे. हा व्हिडिओ माझं बर्थडे बॅशपूर्वीचं गिफ्ट आहे.” असं पूनमने ट्विट केलं आहे. यूट्युबने व्हिडिओ काढून टाकला तरीही पूनमचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. उलट तिने आता फॅन्सलाच विचारलं आहे की एखादी अशी वेबसाइट सुचवा जिथे मी हा माझा “डर्टी व्हिडिओ” तुम्हाला दाखवू शकेन.
 
सणाच्या पावित्र्याला काळीमा फासणाऱ्या रंगेल पूनमच्या इच्छेला यूट्युबने मात्र सरळ उडवून लावलं आहे.

First Published: Wednesday, March 7, 2012, 13:36


comments powered by Disqus