Last Updated: Friday, March 9, 2012, 18:49
मुंबईत झालेल्या रंगांच्या बाधेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारखान्याच्या बाहेरुन हे विषारी रंग मुलांनी उचलले, तो नवरंग कंपाऊंडमधला रंग बनवण्याचा अवैध कारखाना मुंबई महापालिकेनं नोव्हेंबर २०११ मध्ये तोडला होता. मात्र त्यातले रंग तिथेच पडून होते. ते रंग उचलण्याची कारवाई कुणीही केली नाही. आणि हाच रंग मुलांनी उचलला आणि होळीचा बेरंग झाला.