Last Updated: Friday, November 18, 2011, 15:36
झी २४ तास वेब टीम, नाशिक दिवाळी जवळ आली की दिव्यांची आरास, फराळ, अभ्यंग स्नान, फटाके याचबरोबर आठवते ती मंगलमय, सूरमयी दिवाळी पहाट. पण, नाशिककर अनुभवतील ती सूरमयी दीपावली पूर्वसंध्या. 'जाणीव' संस्थेच्या वतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला दि. २३ रोजी सायं. ६ वाजता स्वप्नील बांदोडकर याची ‘राधा ही बावरी’ मैफल आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सहगायिका अमृता नातू व अभिनेता पुष्कर श्रोत्री उपस्थित राहणार आहेत.
एहसास मल्टिपर्पज असोसिएशनच्या सहकार्याने उदोजी मराठा बोर्डिंग मैदान, प्रसाद मंगल कार्यालयासमोर, गंगापूररोड येथे ही मैफिल रंगणार आहे.
First Published: Friday, November 18, 2011, 15:36