Last Updated: Monday, March 31, 2014, 19:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआजकाल तरुण ज्याच्या तालावर नाचतात तो हनी सिंह मोठा फॅन आहे टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीचा. हनी सिंहनं हे स्वत: कबुल केलंय ते धोनीच्या शहरात रांचीमध्ये... तो म्हणाला मला खूप आनंद झालाय की मी धोनीच्या शहरात आहे.
हनी सिंह यानं रविवारी धुर्वा इथल्या जेएससीए स्टेडियममध्ये आपल्या गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. आपल्या `लुंगी डांस` सारख्या गाण्यांनी रांचीकरांना हनी सिंहनं थिरकायला लावलं.
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत यांच्याकडे राचीतल्या काही राजकीय पक्षांनी तक्रार केलीय की आपल्या प्रचारासाठी जेएससीएचे अध्यक्ष अमिताभ चौधरीनं स्टेडियममध्ये हनी सिंहचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केला. यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 31, 2014, 15:25