Last Updated: Monday, June 17, 2013, 18:16
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबादआजपर्यंत राज्याच्या राजकीय पटलावरून आणि मराठवाड्यातील असूनसुद्धा मराठवाड्याच्या राजकारणातून जवळपास गायब झालेले अशोक चव्हाणांनी आज पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत दिले. निमित्त होतं मराठवाडा जनता विकास परिषदेची बैठक.
मराठवाड्यावर पाणीवाटपाबात सतत अन्याय होत असल्याच्या कारणावारून रविवारी मराठवाड्यातील सर्वच आमदारांनी मराठवाडा जनता विकास परिषदेनं बैठक बोलावली होती आणि त्यात अग्रस्थानी होते अशोकराव चव्हाण.. चव्हाणांनी सुद्धा मराठवाड्यावर अन्यायाबाबत आता दंड थोपटण्याची वेळ आल्याच सांगत आक्रमक पवित्रा घेतला.. मराठवाड्यावला हक्काचे पाणी मिळायलाच हवे असा आक्रमक सूर आता त्यांनी लावलाय..
जवळपास सर्वच पक्षाचे 15 आमदार हजर असलेल्या या बैठकीत चव्हाण चांगलेच आक्रमक वाटत होते..
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, June 17, 2013, 17:46