Last Updated: Monday, June 16, 2014, 16:24
www.24taas.com, झी मीडिया, लातूरलातूरमध्ये एका वृद्ध माणसाने तहसीलदारावर चाकूने प्राणघातक हल्ला केलाय.
आरोपीचं अनेक दिवसापासून शेतीचं प्रकरण प्रलंबित होतं, यातून हा हल्ला झाला असल्याचं सांगण्यात येतंय.
ज्यांच्यावर हल्ला झाला त्या तहसीलदाराचं नाव महेश शेवाळे असं आहे. या हल्ल्यात तहसीलदार गंभीर जखमी झाले आहेत.
महेश शेवाळे आज सकाळी कार्यालयात जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. शिवाळे यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी हल्लेखोर बद्रे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्यांचं वय सुमारे 70 ते 74 असल्याचं कळतं. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बद्रे यांचं शेतीचं प्रकरणी अनेक वर्ष प्रलंबित होतं. त्यामुळे त्रस्त झालेल्या बद्रे यांनी आज तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला केला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 16, 2014, 16:24