मदत नाही तर ‘मरण’ द्या!, aurangabad farmer asks permission for suicide

मदत नाही तर ‘मरण’ द्या!

मदत नाही तर ‘मरण’ द्या!
www.24taas.com, औरंगाबाद

आज औरंगाबादमध्ये एका शेतकऱ्यांनं आपल्या १२ एकर जमिनीवर उभी असलेली मोसंबीची बाग जाळून टाकल्याची धक्कायदायक घटना घडलीय. याच औरंगाबाद जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांची स्थिती काही वेगळी नाही. ‘आम्हाला मदत नाही तर मरण तरी द्या’ अशी केविलवाणी मागणी शेतकरी करत आहे.

काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद जिल्ह्यातलेच शेतकरी सांडू जाधव य़ांनी आत्महत्येस परवानगी द्यावी अशी मागणी सरकारकडे केली होती. शेतामध्ये होणारं नुकसानं सहन न झाल्यानं त्यांनी नाईलाजानं ही मागणी केली होती. तहसीलदारांना लिहलेल्या पत्रात त्यांनी काय म्हटलयं ते पाहूयात...

सांडू जाधव यांचं पत्र

माननीय तहसीलदारसाहेब,

मी सांडू जाघव, मुक्काम पोस्ट घोडेगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद येथील रहिवासी असून पाणी नसल्यानं १० एकरांवरचा ऊस आणि ५ एकरांवची मोसंबी वाळून गेलीय. गोठ्यात ३६ जनावरं आहेत. त्यांना खायला चारा नाही, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय. सरकारनं पंचनामा करून तातडीनं मदत करावी किंवा आत्महत्या करायला परवानगी द्यावी

आपला
सांडू जाधव

First Published: Friday, April 12, 2013, 16:06


comments powered by Disqus