मोदींच्या सभेसाठी वाराणसीत मैदान नाही, परवानगी नाकारली

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 16:53

देशात आज आठव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. १२ तारखेला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडेल. तेव्हा नरेंद्र मोदींच्या वाराणसी इथंही मतदान होणार आहे. त्या अगोदर उद्या नरेंद्र मोदी वाराणसीत सभा घेणार आहेत. मात्र ही सभा आता परवानगीच्या कचाट्यात सापडली आहे.

`दुसऱ्या विवाहासाठी पत्नीची मंजुरी गरजेची नाही`

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 13:12

धार्मिक मुद्यांवर सरकारसमोर कायदेशीर मतं मांडणाऱ्या पाकिस्तानच्या एका संविधानिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाला दुसरा विवाह करण्यासाठी सध्याच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही.

चीनमध्येही मिळाली दोन अपत्यांना परवानगी!

Last Updated: Sunday, December 29, 2013, 15:49

चीनच्या मंत्रिमंडळानं शनिवारी संमत केलेल्या प्रस्तावामुळे, आता चीनमधील ज्या जोडप्यांना केवळ एकच अपत्य आहे अशा जोडप्यांना दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी प्रदान करण्यात आलीय.

दुसऱ्या अपत्याच्या जन्माच्या अगोदर घ्या सरकारची परवानगी

Last Updated: Monday, November 25, 2013, 23:21

चीनमध्ये सध्या तरुणांपेक्षा म्हातारी लोकसंख्या वरच्या स्तराला जाऊन पोहचलीय. त्यामुळे, आत्तापर्यंत अंमलात आणलेल्या ‘एक अपत्य’ कायद्याला फाटा देत दाम्पत्याला दुसऱ्या अपत्याला जन्माला घालण्याची मुभा देण्याचं सरकारनं ठरवलंय.

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी परवानगी

Last Updated: Monday, October 28, 2013, 09:57

रायगड दिवेआगर इथलं सुवर्ण गणेश मंदिर नव्यानं बांधण्यासाठी अखेर मोक्का न्यायालयाची परवानगी मिळालीय. २४ मार्च २०१२ला या मंदिरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम सोन्याचा गणेश मुखवटा आणि काही अलंकार लंपास केले होते. यावेळी २ पहारेकर्‍यांनाही ठार मारण्यात आलं होतं.

शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?... शिवसेनेचा!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 18:58

आवाज कुणाचा... शिवसेनेचा... ही घोषणा पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्या सायलेन्स झोनमध्ये घुमणार आहे. कारण शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई हायकोर्टाने परवानगी दिलीय..

महापालिकेनं नाकारली सेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 15:27

सलग चौथ्या वर्षी मुंबई महापालिकेनं शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी नाकारलीय. यावेळीही परवानगी न दिल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.

विघ्नहर्त्याच्या आगमनाआधी मंडळांवर विघ्न!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 12:00

गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना यंदा महापालिकेच्या अजब कारभाराचा फटका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बसलाय.

‘राजा’च्या मंडपाला महापालिकेची परवानगी

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 09:47

गेल्या वर्षीचे खड्डे न बुजविल्यामुळं आधी मागील वर्षीचा १९ लाखांचा दंड भरा, तेव्हाच मंडपासाठी परवानगी देऊ असा पवित्रा महापालिकेनं घेतला होता. मात्र दंडाची रक्कम प्रॉपर्टी टॅक्समधून वसूल केली जाईल, अशी भूमिका घेत आता मंडपासाठीची परवानगी महापालिकेनं दिलीय.

मदत नाही तर ‘मरण’ द्या!

Last Updated: Friday, April 12, 2013, 16:06

औरंगाबाद जिल्ह्यातलेच शेतकरी सांडू जाधव य़ांनी आत्महत्येस परवानगी द्यावी अशी मागणी सरकारकडे केली होती...

राजना गैरहजर राहण्याची कोर्टाची परवानगी

Last Updated: Monday, April 8, 2013, 14:54

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावार त्यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय. तसंच यापुढे सुनावणीस गैरहजर राहण्याचीही त्यांना परवानगी देण्यात आलीय.

अरबी समुद्रात शिवस्मारकाची जागा निश्चित!

Last Updated: Thursday, March 28, 2013, 16:25

अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाची जागा निश्चित झाली आहे. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीपासून साडेतीन किलोमिटर अंतरावर हे स्मारक असणार आहे.

गणेश मिरवणुकीत वाद्यांना परवानगी

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 20:48

पुण्यातल्या गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी. यंदा गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये रात्री बारानंतरही पारंपारिक वाद्य वाजवता येणार आहेत. त्याचबरोबर गणेश मंडळांवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांचंही गणेशोत्सवाआधी विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांना यावर्षी डबल धमाका मिळालाय.

राज यांच्या सभेला परवानगी, मोर्चावर कारवाई?

Last Updated: Monday, August 20, 2012, 23:37

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाबाबतचा गोंधळ अजूनही कायमच आहे. कारण आझाद मैदानावरील मनसेच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे.

'राज ठाकरेंनी केला न्यायालयाचा अवमान'

Last Updated: Saturday, July 14, 2012, 12:34

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरुद्ध उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आलीय. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं जाहीर सभेस नकार देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल ही अवमान याचिका आहे.

जेलमध्ये कैद्यांना सेक्सची परवानगी ?

Last Updated: Friday, June 8, 2012, 11:21

लवकरच पंजाब हे असं पहिलं राज्य असेल कि जिथे जेलमधल्या कैदींना सेक्स करण्याची सुविधा मिळणाची शक्यता आहे. ुपंजाबचे डीजीपी (जेल) शशिकांत यांनी यासंबंधी राज्य सरकारला एक प्रस्ताव पाठवला आहे.

वॉशिंग्टनमध्ये शीख पगडीधारी पोलीस

Last Updated: Thursday, May 17, 2012, 15:58

शीख पोलिसांना आपल्या धार्मिक चिन्हांसहीत काम करण्याची परवानगी देणारं, वॉशिंग्टन हे अमेरिकेतील पहिलं शहर ठरलं आहे.

'तो' अखेर ती' होणार.. लिंग बदलाला परवानगी

Last Updated: Monday, May 7, 2012, 16:24

गुवाहाटीच्या २१ वर्षीय विधान बरुआला मुंबई हायकोर्टानं अखेर लिंगबदलाची परवानगी दिली आहे. राज्यात अथवा केंद्रात लिंग बदलण्याला विरोध करण्याबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही.

आत्महत्येसाठी हवीय राष्ट्रपतींची परवानगी

Last Updated: Friday, May 4, 2012, 12:54

लखनऊमधील फत्तेपूर येथे एक अजब प्रकार पुढे आला आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे. त्यावर एका पोलीस हवालदारांने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनाच साकडे घातले आहे.वरिष्ठांकडून छळ होत असल्याने जीवनाला कंटाळलेल्या पोलीस हवालदाराला आत्महत्या करायची आहे, तसे त्यांने राष्ट्रपतीनाच पत्र लिहिले आहे.

सचिनच्या सत्काराला परवानगी नाकारली...

Last Updated: Thursday, April 12, 2012, 17:51

मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीनं आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्टनं परवानगी नाकारली आहे.

हिरानंदानीनं परवानगीशिवाय काम करू नये

Last Updated: Thursday, February 23, 2012, 11:48

हिरानंदानी बिल्डरनं यापुढं कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय पवईत कोणतेही बांधकाम करू नये असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. पवईमध्ये दुर्बल घटकांसाठी ३१०४ घरे १३५ रुपये चौरस फुटानं देण्याचे आदेश देत घरांचा ताबा दिल्याशिवाय बांधकामास परवानगी नाकारली आहे.

चीनी उद्योजकांना भारताचा दरवाजा बंद

Last Updated: Thursday, February 9, 2012, 17:11

चीनच्या उद्योजकांना भारताने परवानगी नाकारली आहे. हा चीनसाठी एक इशारा असल्याचे समजला जात आहे. याआधी चीनमध्ये भारतीय व्यापाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यावेळी चीनने काहीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही झटका दिल्याचे बोलले जात आहे.

निकाल 'राज' विरोधी, सभा आता घेणार कधी?

Last Updated: Thursday, February 9, 2012, 16:21

शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठीची मनसेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. हायकोर्टानं मनसेला शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनसेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.