Last Updated: Thursday, June 19, 2014, 17:10
www.24taas.com, झी मीडिया, बीडपोलीस भरती चाचणी दरम्यान महिला उमेदवार मैदानातच कोसळल्याची घटना बीडमध्ये घडलीय. संगीता सानप असं या उमेदवाराचं नाव आहे.
तीन किलोमीटर धावण्याच्या प्रकारात चक्कर आल्यानं संगीता मैदानावरच कोसळली. तिला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे तिचे प्राण वाचले.
संगीताचे वडील पोलीस दलात कार्यरत आहेत. वडिलांप्रमाणे पोलीस होण्याचं स्वप्न घेऊन ती पोलीस भरती चाचणीसाठी आली. मात्र ती तीन किलो मीटर धावली आणि मैदानावरच कोसळली. महिला आणि मुलींसाठी काही क्रीडाप्रकार कमी करायला पाहिजेत अशी मागणी संगीताच्या आईनं केलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 19, 2014, 17:10