Dalit women were entering the temple, husband beaten

मंदिर प्रवेश, दलित महिलेच्या पतीला मारहाण

मंदिर प्रवेश, दलित महिलेच्या पतीला मारहाण
www.24taas.com,उस्मानाबाद

दलित महिलेने मंदिरात प्रवेश केल्याच्या कारणावरून, तिच्या पतीला गाव गुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीये. उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी गावात ही घटना घडलीये.

कुमुदिनी गणपती कांबळे असं त्यांचं नाव आहे. विशेष म्हणजे बामणी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कुमुदिनी सदस्य म्हणून निवडून आल्यायेत. २३ आक्टोंबरला गावच्या हनुमान मंदिरात जावून त्यांनी दर्शन घेतलं. या कारणावरून त्यांचे पती गणपती कांबळे यांना गावातील सवर्ण समाजाच्या गावगुंडांनी मारहाण करून घरावर दगडफेक केली होती.

या घटनेला १५ दिवस उलटूनही जिल्हा प्रशासनाकडून मात्र दोन्ही समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले गेले नाहीत. गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. तर सामाजिक संघटनाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय.

संघटना आज मंदिर प्रवेश आणि बैठा सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. तर पोलिसांनी याप्रकरणी १४ जणांना अटक करून त्यांच्यावर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

First Published: Wednesday, November 7, 2012, 14:16


comments powered by Disqus