कामगार नेत्याला मारहाण अंगलट; तरी पोलिसांची दबंगगिरी सुरूच

Last Updated: Sunday, December 22, 2013, 20:20

चंद्रपूरमधील राष्ट्रवादीचे कामगार नेते प्रमोद मोहोड यांना वरोरामध्ये ‘डीवायएसपी’ गणेश गावडे यांनी केलेली जबर मारहाण उभ्या महाराष्ट्राच्या समोर आली. मात्र, एवढ्यावरच पोलिसांचं समाधान झालेलं नाही.

पोलिसाची गुंडागिरी, भरचौकात कामगार नेत्याला बेदम मारहाण

Last Updated: Saturday, December 21, 2013, 23:03

चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक-एम्टा कोळसा खाणीतील कामगारांच्या सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कामगार नेत्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या मारहाणीत प्रमोद मोहोड या कामगार नेत्याचा हात मोडला.

आमदार राम कदम, क्षितिज ठाकूरांवर आरोपपत्र

Last Updated: Thursday, June 13, 2013, 11:32

वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळाच्या आवारात मारहाण केल्याप्रकरणी मनसे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरूद्ध येत्या ३0 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. तसे राज्यशासनाने स्पष्ट केलेय.

पोलीस मारहाण : क्षितीज ठाकूर, राम कदम दोषी

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 13:39

पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित बविआचे आमदार क्षितीज ठाकूर आणि मनसे आमदार राम कदम यांना दोषी ठरविण्यात आलेय.

पीएसआय सचिन सूर्यवंशी अखेर निलंबित

Last Updated: Monday, March 25, 2013, 16:41

महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारांनी चोप दिलेल्या पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले आहे.

सचिन सूर्यवंशींना अटक कधी?

Last Updated: Monday, March 25, 2013, 14:38

राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळला आहे. पीएसआय सचिन सूर्यवंशींना कधी अटक होणार असा सवाल संतप्त आमदारांनी विधानसभेत विचारला.

आमदार क्षितीज ठाकूर देणार राजीनामा?

Last Updated: Monday, March 25, 2013, 12:43

पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मारहाणप्रकरणी शुक्रवारी अटक झाल्यानंतर ते कोठडीत होते. आज त्यांना जामीन मिळालाय.

मनसे, बविआच्या निलंबित आमदारांना जामीन

Last Updated: Monday, March 25, 2013, 14:10

पीएसआय सचिन सूर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळाला आहे. तीन दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागले. त्यांची १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आलेय.

मंदिर प्रवेश, दलित महिलेच्या पतीला मारहाण

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 14:16

दलित महिलेने मंदिरात प्रवेश केल्याच्या कारणावरून, तिच्या पतीला गाव गुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीये. उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी गावात ही घटना घडलीये.

चोर तो चोर वर शिरजोर...

Last Updated: Friday, May 18, 2012, 21:33

भिवंडीत वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये दारु प्यायलेल्या तीन युवकांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या सुभाष चौकात ही घटना घडली.

राष्ट्रवादी आमदाराला टोल नाक्यावर मारहाण

Last Updated: Monday, April 30, 2012, 13:45

पुण्याजवळ खेड शिवापूर टोल नाक्यावर आमदार संजय पाटील यांना मारहाण करण्यात आली. आमदार असल्याचं सांगूनही मारहाण केल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. दरम्यान, मारहाण प्रकरणी चार कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे.

मनसैनिकांची हप्त्यासाठी मारहाण?

Last Updated: Sunday, March 25, 2012, 18:40

घड्याळ विक्रीचं दुकान लावणाऱ्या एका फेरीवाल्याला शस्त्राच्या सहाय्याने जखमी करण्याचा प्रकार मीरारोड स्थानकाबाहेर घडला आहे. मोहम्मद युसूफ आलम असं त्याचं नाव असुन,त्याने हप्ता द्यायला नकार दिल्याने त्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारलं असा आरोप होतो आहे.

निवडणूक कर्मचा-यांना मारहाण

Last Updated: Saturday, January 21, 2012, 07:31

पुण्यात आचारसंहिताभंग करुन राजकीय नेते थांबलेले नाहीत, तर निवडणूक कर्मचा-यांना मारहाणीपर्यंत त्यांची मजल गेलीय. निवडणूक कर्मचा-यांना मारहाण आणि कॅमेरा फोडण्याचा प्रकार पुण्यात घडलाय. काँग्रेसचे उमेदवार चंद्रशेखर घाटे यांनी ही प्रताप केलाय.

अण्णा समर्थकांना जोरदार मारहाण

Last Updated: Friday, October 14, 2011, 10:02

‘टीम अण्णां'चे सदस्य प्रशांत भूषण यांच्या मारहाणीला 24 तासही उलटत नाहीत, तोच अण्णा हजारे यांच्या समर्थकांना आज गुरूवारी नवी दिल्लीत पुन्हा मारहाण करण्यात आली. हा हल्ला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचे स्पष्ट झाले.