दुष्काळाने घेतला लहानग्याचा बळी drought kills a boy

दुष्काळाने घेतला लहानग्याचा बळी

दुष्काळाने घेतला लहानग्याचा बळी
www.24taas.com, औरंगाबाद

दुष्काळानं परिसीमा गाठली आहे. दुष्काळ आता थेट जीवावरच उठलाय. औरंगाबाद जिल्ह्यात लाडसावंगी गावात दुष्काळानं एका 13 वर्षीय मुलाचा बळी घेतलाय.

गावात पाण्याचा टँकर आल्यानंतर पाणी भऱण्यासाठी गर्दी झाली. अजय भालेराव हा पाणी भऱण्यासाठी टँकरवर चढला होता मात्र त्याचा अचानक तोल गेला आणि तो टँकरच्या मागच्या चाकाखाली येऊन चिरडला गेला. लाडसावंगी गावात 8 दिवसातून केवळ एक वेळा टँकर येतो. त्यामुळं पाणीभऱण्यासाठी तोबा गर्दी होते. आणि गर्दीतल्या धावपळीतूनच अजयचा बळी गेला. या हद्रयद्रावक घटनेनंतर संपूर्ण गाव सुन्न झालंय.

महत्वाचं म्हणजे दुष्काळी परिस्थितीमुळे अजयचे आई-वडील काम शोधण्यासाठी शहरात आले आहेत. अजय आपल्या काकांकडे गावातच राहत होता.

First Published: Monday, December 31, 2012, 20:51


comments powered by Disqus