गोपीनाथ मुंडेंनी घेतले उपोषण मागे, gopinath munde, huger strike, drought

गोपीनाथ मुंडेंनी घेतले उपोषण मागे

गोपीनाथ मुंडेंनी घेतले उपोषण मागे
www.24taas.com, औरंगाबाद

राज्यात दुष्काळाचे गहिरे संकट आहे. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे उपनेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. आज मुंडे यांनी आपले उपोषण मागे घेतले.

राज्यातील १६ जिल्ह्यांतील १२५ तालुक्यांपमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने या तालुक्यां तील गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत.
या गावांमध्ये चारा, पाणी, रोजगाराचा गंभीर प्रश्ने निर्माण झाला आहे. हे चित्र पाहता संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी येथील विभागीय आयुक्तण कार्यालयासमोर सोमवारपासून मुंडे यांनी उपोषण सुरू केले होते.

मुंडे यांनी दुसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. वनमंत्री पतंगराव कदम यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, आज मुंडेंच्या रक्तातील साखरेचं प्रमाण घसरल्याने त्यांची प्रकृती बिघडली. मुंडे यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून पतंगराव कदम औरंगाबादला गेले. मुंडेशी सकारात्मक चर्चा करून त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर मुंडेंनी उपोषण मागे घेतलं.

First Published: Tuesday, April 9, 2013, 17:50


comments powered by Disqus