माझ्या बाबांनी पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण करीन - पंकजाI will complete My father`s dream - Pankaja Mund

माझ्या बाबांनी पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण करीन - पंकजा

माझ्या बाबांनी पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण करीन - पंकजा
www.24taas.com, झी मीडिया, बीड

माझ्या बाबांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करीन, आता रडणार नाही तर तुमच्या साथीनं लढणार आहे, अशी भावनिक साद घालीत पंकजा मुंडे-पालवे यांनी भगवान गड इथून आपल्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर पहिल्यांदाच पंकजा या भगवान गड इथं आल्या होत्या. मी गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आहे. मला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही. बेईमानी करणारांना आता माफ करणार नाही. त्यांच्याशी तडजोडी करणार नाही, असं सांगत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

या कार्यक्रमाला जवळपास दोन लाख नागरिक हजर होते. पंकजा याच आता गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारस आहेत, अशी घोषणा नामदेव शास्त्री यांनी केली. पंकजा या आता भगवान गडाची मुलगी आहे, असं सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं आवाहन नामदेव शास्त्री यांनी केलं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 18, 2014, 21:45


comments powered by Disqus