माझ्या बाबांनी पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण करीन - पंकजा

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 21:45

माझ्या बाबांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करीन, आता रडणार नाही तर तुमच्या साथीनं लढणार आहे, अशी भावनिक साद घालीत पंकजा मुंडे-पालवे यांनी भगवान गड इथून आपल्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

परळीतील दगफेकीची चौकशी करा - पंकजा पालवे-मुंडे

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 21:57

गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराच्यावेळी जी दगडफेक झाली ती मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केली नाही. असे त्यांचे कार्यकर्ते नाही. दगडफेक करणारे मुंडे साहेबांचे समर्थक नाहीत, दगफेकीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कन्या आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी केली आहे.

मुंडेच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी – उद्धव ठाकरे

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 16:36

लोकांच्या भावना लक्षात घ्या असं म्हणत या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परळी येथे केली आहे. परळीत गोपीनाथ मुंडेच्या अंत्यविधीसाठी उद्धव ठाकरे आले होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे अनंतात विलीन

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 17:04

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आज बीड जिल्ह्यातील परळीतल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाण्यांच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

काकांवर टीका, मी भाजपचा - धनंजय मुंडे

Last Updated: Thursday, January 19, 2012, 16:11

आपले ज्यांच्याकडून कौतुक व्हायला हवे होते, त्यांच्याकडून ते कौतुक झाले नाही, असा अप्रत्य़क्ष टोला राष्ट्रवादीच्या मंचावरून गोपीनाथ मुंडेना यांना त्यांचे पुतने आमदार धनंजय मुंडे यांनी लगावला. आज माझ्या कार्यकर्त्यांचा जो सन्मान होत आहे, तो पाहण्यासाठी मी इथे आलो आहे, मी अजून भाजप मध्ये आहे, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले.

धनं'जय'ची गोपीनाथांवर 'मात'!

Last Updated: Monday, December 26, 2011, 17:28

परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर पुतण्यानं काकाला मात दिलीय. धनंजय मुंडे यांच्या उमेदवाराची नगराध्यपदी निवड झाली असून गोपीनाथ मुंडे यांच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव झाला आहे.

मुंडेंची काढणार पुतण्या विकेट

Last Updated: Saturday, December 24, 2011, 14:40

परळीच्या नगराध्यक्षपदावरून भाजपच्या नेत्यांचा नागपुरात काथ्याकुट सुरु असतानाच साता-यात मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक क्रिकेट खेळण्यात दंग होते. सातारजवळच्या एका हॉटेलवर या नगरसेवकांचा डेरा आहे.