Last Updated: Friday, November 2, 2012, 14:01
www.24taas.com, परभणी परभणीतील पोलिस मुख्यालयाजवळ असलेल्या पोलीस क्वार्टरमध्ये महिला पोलिसाची हत्या झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
परभणी पोलिस मुख्यालयाच्या क्वार्टरमध्ये चित्रा पाटील या राहत होत्या. अज्ञात व्यक्तीने गुरुवारी रात्री त्यांची हत्या केली. पोलिस मुख्यालयामध्ये महिला पोलिसाची हत्या झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
ही हत्या नेमकी कोणी केली असावी या संदर्भात तपास सुरू असून पोलिस धागेदोरे शोधण्याचे काम करीत आहे.
First Published: Friday, November 2, 2012, 14:01