Last Updated: Saturday, October 13, 2012, 20:35
विशल करोळे, www.24taas.com, औरंगाबादऔरंगाबदमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नियमांचा भंग झाल्याची घटना घडली आहे. विद्यापीठाची परीक्षा सुरू असतांना या सरस्वती भुवन कॉलेजच्या पटांगणात १२ बलुतेदार संघटनेचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
त्यामुळे सायलेन्स झोनचा भंग झाल्याचं बोललं जातंय. या कार्यक्रमाला शिक्षणसंस्थेनं परवानगी दिलीच कशी असा सवालही उपस्थित केला जातोय.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कांग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
First Published: Saturday, October 13, 2012, 20:35