काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात महायुतीचा दुसरा मेळावा mayauti and third rally against ncp and congr

काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात महायुतीचा दुसरा मेळावा

काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात महायुतीचा दुसरा मेळावा
www.24taas.com, झी मीडिया, बीड

राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात महायुतीचा आज दुसरा मेळावा बीडमध्ये होतं आहे. बीडच्या अटलबिहारी वायपेयी मैदानावर महायुतीची ही सभा होत आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच महायुतीचा एल्गार घुमणार असल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. महायुतीच्या मेळाव्यासाठी जोरदार तयारी झालीय. याच मैदानावरून माजी पंतप्रधान अटलबिहारी वायपेयी यांनी १९९९ मध्ये आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला होता.

नुकताच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर याच मैदानातून विनायक मेटे यांनी सरकारला इशारा दिला होता. त्याच मैदानावरून आज महायुतीचा एल्गार होणार आहे.

पवारांना एनडीएमध्ये येण्यास विरोध करणारे गोपीनाथ मुंडे होम पीचवर कशी बॅटिंग करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 16, 2014, 15:34


comments powered by Disqus