शिवसेना खा. राजकुमार धूत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा!, Molestation charges on MP Rajkumar Dhoot

शिवसेना खा. राजकुमार धूत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा!

शिवसेना खा. राजकुमार धूत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा!
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

शिवसेनचे राज्यसभेचे खासदार आणि प्रसिद्ध उद्योगपती राजकुमार धूत यांच्यावर कोर्टाच्या आदेशानुसार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

एका महिलेनं धूत यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. तशी तक्रारही तीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

तर राजकुमार धूत यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. आरोप बिनबुडाचे असल्याचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 12, 2013, 22:34


comments powered by Disqus