प्रीती झिंटा विनयभंग : अर्जुन साक्ष नोंदविणार?

Last Updated: Friday, June 20, 2014, 15:10

प्रीती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात आता एका नवीन वळणावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस या प्रकरणात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा जबाब रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे.

सावधान! सायनमध्ये सीरियल मोलेस्टर सक्रीय

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 16:56

पश्चिम उपनगरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा सीरियल मोलेस्टर आता दक्षिण मध्य मुंबईत सक्रिय झाला आहे. त्यानं सायनमध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलीला आपलं लक्ष्य केलं आहे.

विनयभंगावरून शाळेची तोडफोड, संस्थाचालकाला धक्काबुक्की

Last Updated: Monday, April 7, 2014, 14:07

पुण्याच्या सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत आज संतप्त पालकांनी तोडफोड केलीय. स्कूल बलच्या अटेंडन्टकडून मिनी केजीमध्ये शिकणा-या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली.

अडसूळांविरोधात नवनीत राणाची विनयभंगाची तक्रार

Last Updated: Monday, March 17, 2014, 11:21

अमरावतीचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत कौर यांनी विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केलीय. गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये नवनीत यांनी आपल्या पतीसह जावून तक्रार दाखल केली.

तरुणीच्या विनयभंगानंतर मनसे नेता फरार

Last Updated: Saturday, March 15, 2014, 09:24

टिटवाळ्यात एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

लोणावळ्यात चित्रपट लेखिकेचा विनयभंग

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 18:44

चित्रपट लेखिकेचा लोणावळ्यात विनयभंग झाल्याची घटना लोणावळ्यात घडली आहे. चित्रपटात काम मिळवून देतो, असं आमीष दाखवून या भामट्यांनी या तरूणीला फसवलं आहे.

भरदिवसा शाळकरी मुलीचं अपहरण आणि विनयभंग

Last Updated: Thursday, December 19, 2013, 12:14

चंद्रपूर शहरात एक खळबळजनक घटना घडली. एका अल्पवयीन शाळकरी मुलीचं शाळेसमोरूनच एका वाहनातून पाच तरुणांनी अपहरण केलं आणि तिचा चालत्या गाडीतच विनयभंग करत तिला चंद्रपूर-नागपूर महामार्गावरच्या भद्रावती शहराजवळच्या एका मंदिराजवळ गाडीतून फेकून दिलं.

धक्कादायक : चालत्या रिक्षात मुलीचा विनयभंग

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 18:43

मोठ्या शहरांतील खोटी सुरक्षितता पुन्हा एकदा उघडी पडलीय... दिवस-रात्र पळणाऱ्या मुंबईमध्ये भरदिवसा एका रिक्षात एका विद्यार्थिनीवर विनयभंगाचा प्रसंग ओढावलाय.

`आप`चे आमदार अडचणीत, विनयभंगाचा गुन्हा

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 10:02

एक वर्षभरात राजकीय जादू करीत दिल्लीत आपले अस्तित्व दाखवून देशात चर्चेत राहणाऱ्या आम आदमी पार्टी अर्थात आपने अनेकांना चिंतन करायला लावले. याच आपचे नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्रसिंग कोली यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आपचे आमदार अडचणीत आलेय.

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Last Updated: Saturday, November 30, 2013, 18:44

छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातल्या घोटी गावात घडलीय

मुंबईत ‘विनयभंग’ आणि ‘बलात्कारा’चं प्रमाण वाढलं!

Last Updated: Friday, November 22, 2013, 15:10

आजकाल विनयभंगाचे आणि बलात्काराची प्रकरणं दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. मुंबईची दिल्ली होतेय की काय? असंच काहीसं वाटू लागलं आहे. मुंबईत बलात्कार आणि विनयभंग सारख्या गुन्ह्यांत ५७ टक्क्यांनी वाढ झाली, हि धक्कादायक माहिती ‘प्रजा फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेनं केलेल्या पाहणीतून समोर आलीय.

‘त्या’ तरुणीचा सुप्रिम कोर्टाच्या न्यायमूर्तीनींच केला विनयभंग?

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 18:14

मागील वर्षी जेव्हा दिल्ली गँगरेप प्रकरणानं दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरवून सोडला होता. तेव्हा ख्रिसमसच्या रात्री दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये या वकील तरूणीसोबत विनयभंगाचा प्रकार घडला.‘जर्नल ऑफ इंडियन लॉ अँड सोसायटी’च्या ब्लॉगमध्ये या वकील तरूणीनं हा भयंकर अनुभव मांडलाय.

तरूणीची छेडछाड : आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलीस निलंबित

Last Updated: Thursday, October 17, 2013, 13:02

छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या तिघांमध्ये एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे.

छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 12:34

छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला तळेगाव दाभाडे इथे मंगळवारी हा प्रकार घडलाय.

पोलीस दलातील महिलाही असुरक्षितच!

Last Updated: Monday, October 7, 2013, 23:07

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याचे आदेश गृहमंत्री आर आर पाटलांनी दिलेत खरे, मात्र पोलिस दलातल्याच महिला कर्मचारी सुरक्षित नसल्याचं समोर आलंय.

शिवसेना आमदाराला महिला पोलिसाच्या विनयभंगाबद्दल अटक

Last Updated: Thursday, September 26, 2013, 18:20

कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेच्या 16 कार्यकर्त्यांना जुना राजवाडा पोलीसांनी अटक केलीय.राजेश क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलीस कर्मचा-यांशी हुज्जत घालुन पोलीसांवर दगडफेक करुन दंगल माजविण्याचा प्रयत्न करुन महिला कर्मचा-यांचा विनयभंग केल्याचा गुन्हा पोलीसात दाखल आहे.

बाप्पाला निरोप देताना महिलेचा विनयभंग!

Last Updated: Saturday, September 21, 2013, 06:56

गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत काही नीच आणि नराधम प्रवृत्तीच्या तरूणांनी एका महिलेचा कसा विनयभंग केला, याची छायाचित्रंच ‘मिड डे’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केलीत.

लालबागच्या मुजोर कार्यकर्त्यांसंदर्भात गृहमंत्र्यांच्या सूचना

Last Updated: Monday, September 16, 2013, 17:55

झी मीडियाच्या दणक्यानंतर आता राज्यकर्त्यांना जाग आलीये. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांशी गैरवर्तन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश सहआयुक्तांना दिलेत.

चालत्या रेल्वेत महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक!

Last Updated: Saturday, September 14, 2013, 14:44

चालत्या ट्रेनमध्ये एका महिलेची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला ही व्यवसायाने एक डॉक्टर आहे...

शिवसेना खा. राजकुमार धूत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा!

Last Updated: Thursday, September 12, 2013, 22:34

शिवसेनचे राज्यसभेचे खासदार आणि प्रसिद्ध उद्योगपती राजकुमार धूत यांच्यावर कोर्टाच्या आदेशानुसार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आ. अनिल कदमांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, जामीन मंजुर

Last Updated: Monday, August 26, 2013, 16:28

कायदा करणारे आमदारच आता कायदा हाती घेऊ लागले आहेत. मारहाण करणे, धमकावणे, शिवीगाळ, विनयभंग अशी राडेबाजी लोकप्रतिनिधी म्हणवणा-या आमदारांनीच सुरू केलीय. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वच पक्षांच्या आमदारांचा त्यात समावेश आहे.

'असभ्य' आमदाराला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा!

Last Updated: Sunday, August 25, 2013, 18:54

टोलनाक्यावर महिलांना अर्वाच्य शिविगाळ करणा-या आमदार अनिल कदम यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिशी घातलंय. शिवसेनेच्या संस्कृतीचा दाखला देत त्यांनी अनिल कदम यांची तळी उचलून धरली आहे.

दिल्लीमध्ये विदेशी तरुणीसोबत अश्लील कृत्य

Last Updated: Saturday, August 10, 2013, 17:41

निजामुद्दीन येथे एका विदेशी तरुणीचं भर रस्त्यात अपहरण करण्याचा तसंच विनयभंग झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पीडित तरुणी जर्मनीची आहे.

`आदर्श` शिक्षकाचा प्रताप, विद्यार्थीनीचा विनयभंग

Last Updated: Saturday, August 10, 2013, 12:49

अकोला जिल्ह्यातील शिर्ला गावात गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रयत्न एका नराधम शिक्षकाने केलाय. चंदू गोतरकर असं या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाला `आदर्श` पुरस्कार मिळाला आहे. त्याने विद्यार्थीनीचा विनयभंग केलाय.

विनयभंगाला प्रतिकार; मुलीला दिलं पेटवून!

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 09:06

एकतर्फी प्रेमातून मुलीला जाळण्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या कामरगावमध्ये घडलीय. आपल्या घराशेजारीच राहणाऱ्या एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला पेटवून देण्याचा क्रूरपणा एका नराधमानं केलाय.

महिलांना अश्लील एसएमएस पाठवणाऱ्या तरुणाला अटक

Last Updated: Thursday, July 18, 2013, 19:45

गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील सुमारे ३५ ते ४० महिलांना अश्लील एसएमएस करून हैराण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अभिजीत खरे असे या तरुणाचं नाव असून तो जयपूरचा रहिवासी आहे.

आता महिलांशी एकतर्फी चॅटिंग केल्यास तुरुंगवास!

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 17:17

आता चॅटिंग करताना तरुणांना अधिक सावध व्हावं लागणार आहे. एखाद्या मुलीला किंवा महिला प्रतिसाद देत नसतानाही तुम्ही ऑनलाईन चॅटिंग करत राहिलात, तर तुम्हाला तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.

आश्रमातील कर्मचाऱ्यांकडून ३४ मुलींचा विनयभंग

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 14:33

पेठरोडवरील जय आनंद निराश्रीत अनाथ बालगृहातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी बालगृहात कार्यरत असणार्‍या चौघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकाने तब्बल २९ विद्यार्थिनींचा केला विनयभंग

Last Updated: Friday, March 22, 2013, 22:15

नाशिकमधल्या वाय डी बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षकाविरोधात २९ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांधीजींच्या आश्रमातही महिलेवर अत्याचार

Last Updated: Sunday, March 3, 2013, 18:05

देशात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देशात ऐरणीवर आला असताना वर्ध्याच्या गांधी आश्रमातही एका सेविकेवर विनयभंग झाल्याची तक्रार समोर आली आहे. महात्मा गंधींच्या आश्रमातही महिला सुरक्षित नसल्याचं दिसून आलं आहे.

विद्यार्थिनीचा विनयभंग : उपप्राचार्याला अटक

Last Updated: Tuesday, January 22, 2013, 19:53

पुण्यातील डॉन बॉस्कोच्या उपप्राचार्य म्हणजेच फादरला विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. इज्यू फलकावू असं या फादरचं नाव आहे.

विद्यार्थिनीचा विनयभंग: उपप्राचार्य अटकेत

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 08:28

पुण्यातील डॉन बॉस्कोच्या उपप्राचार्य म्हणजेच फादरला विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. इज्यू फलकावू असं या फादरचं नाव आहे.

चिमुरडीचा ‘बलात्कार नव्हे विनयभंग’

Last Updated: Saturday, January 19, 2013, 17:11

मुंबईत जुहूमध्ये एका स्कूलबसमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झालेला नाही तर तिचा विनयभंग झालाय, असं स्पष्टीकरण पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिलं आहे.

२० वर्षीय मुलीचे विनयभंग प्रकरण, ११ जण दोषी

Last Updated: Friday, December 7, 2012, 21:18

गुवाहटीमध्ये पबबाहेर एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुवाहाटीच्या उच्च न्यायालयाने आज एकूण १६ आरोपींपैकी ११ जणांना दोषी ठरविले.

विनयभंग करणाऱ्या पित्याला मुलीने धाडलं यमसदनी

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 09:12

मध्यप्रदेशातील बालाघाट येथे १८ वर्षांच्या मुलीने विनयभंग करणाऱ्या आपल्या पित्याला मामांच्या सहाय्याने यमसदनी धाडले. या धक्कादायक घटनेमुळे या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं.