Last Updated: Saturday, October 19, 2013, 10:50
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईजालन्याच्या टोल नाक्यावर तलवार घेऊन धिंगाणा घालणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक नूर खान सध्या पोलीस दप्तरी फरार आहे. मात्र, हा नगरसेवक पोलीस अधिकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभा असल्याचे फोटोत कैद झालं आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
टोल नाक्यावर नूर खान आणि त्याच्या काही सहका-यांनी धिंगाणा घातला होता. टोल नाक्याची तोडफोडही केली होती, मात्र त्यानंतरही नूर खानला अटक करण्यात आलेली नाही. तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र ईदच्या दिवशी नूर खान पोलिसांच्या बाजूलाच उभा असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. सोबत शिवसेनेचे माजी आमदार अर्जून खोतकरसुद्धा दिसत आहेत.
पोलीस क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि डिवायएसपी दर्जाचे अधिकारी सुद्धा याठिकाणी उपस्थित होते. इतकं असूनही एखादा फरार आरोपी पोलिसांच्या बाजूला कसा उभा राहू शकतो आणि पोलिस त्याला अटक का करत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. नूर खान राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे. कदाचित त्यामुळे तर त्याला पोलीस पाठीशी घालत नाहीत ना, हा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा. पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, October 19, 2013, 08:09