Last Updated: Saturday, November 23, 2013, 12:08
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबादराज्यात पुन्हा एकदा पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांना फटका बसलाय. औरंगाबादमध्ये आज होणारा पॉलिटेक्निक पहिल्या वर्षाचा पहिल्या सेमिस्टरचा गणिताचा पेपर फुटलाय. यामुळं आज सकाळी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून आता हा गणिताचा पेपर ४ डिसेंबरला घेतला जाणार आहे.
याआधीही मागील महिन्यातच अशाचप्रकारे परीक्षेच्या आधीच पेपर फुटला होता. त्यामुळं विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता. वारंवार विद्यार्थ्यांना असा त्रास सहन करावा लागतोय. तिकडे नाशिकमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाच आंदोलनामुळं पुढं ढकलल्या गेल्या आहेत. तर इकडे ही पेपरफुटी...
अभ्यासू विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द किंवा पुढं ढकलल्या गेल्याचा त्रास होत असला, तरी ज्यांचा अभ्यास झालेलाच नाही, अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द झाल्याचा आनंद झालाय.
हे सर्व खरं असलं तरी प्रश्न हा उपस्थित होतो की, हा पेपर फुटतो तरी कसा... कोण मदत करतं पेपरफुटीला... याला जबाबदार कॉलेज प्रशासन की विद्यार्थी... विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या घटना कधी थांबतील हेच पाहावं लागेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 23, 2013, 12:02