पॉलिटेक्निक पहिल्या वर्षाचा गणिताचा पेपर फुटला, आजची परीक्षा रद्द

Last Updated: Saturday, November 23, 2013, 12:08

राज्यात पुन्हा एकदा पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांना फटका बसलाय. औरंगाबादमध्ये आज होणारा पॉलिटेक्निक पहिल्या वर्षाचा पहिल्या सेमिस्टरचा गणिताचा पेपर फुटलाय. यामुळं आज सकाळी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून आता हा गणिताचा पेपर ४ डिसेंबरला घेतला जाणार आहे.

विद्यापीठ पेपरफुटीप्रकरणी ८ जण अटकेत

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 12:13

मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आलीय. मुंबई क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली असून अटक झालेल्यांमध्ये विद्यापीठ कर्मचा-यांचाही समावेश आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

पेपरफुटीचं लोण राज्यात

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 12:56

पेपरफुटीप्रकरणाचं लोण आता मुंबईतून राज्यात पसरलंय. आज सकाळी औरंगाबादमध्ये इंजिनिअरींगचा पेपर फुटलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दुसऱ्या वर्षाचा गणिताचा पेपर फुटला.

विद्यापीठाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 21:48

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत आज पुन्हा गोंधळ झाला. बीएंमएस विषयाचा पेपर काही परीक्षा केंद्रांवर उशीरा पोहोचलाय. इंटरनॅशनल फायनान्स या विषयाची परीक्षा होती. तीन वाजता हा पेपर सुरू होणार होता. मात्र काही परीक्षा केंद्रांवर तब्बल तासभर पेपर उशीरा सुरू झाला.

पेपरफुटीवर राज्यपाल नाराज

Last Updated: Monday, April 23, 2012, 19:02

नागपूर विद्यापीठातल्या बीकॉमच्या पेपरफुटी प्रकरणी विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालंय. पेपरफुटीप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाची तातडीची बैठक सुरु झालीये. या बैठकीला कुलगुरु, परीक्षा नियंत्रक, अधिष्ठाता आणि चौकशी समितीचे चार सदस्य उपस्थित आहेत.

पेपरफुटीप्रकरणी युवासेना हायकोर्टात जाणार

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 20:56

मुंबई विद्यापीठातल्या टीवायबीकॉम पेपरफुटीप्रकरणी युवासेना हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. अन्य विषयांचे मार्क तपासून ह्युमन रिसोर्स पेपरसाठी सरासरी मार्क देण्याचा पर्याय मुंबई विद्यापीठाने स्वीकारावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.