राज ठाकरेंची पुन्हा सत्ताधाऱ्यांवर टीका Raj Thackeray slams govt.

राज ठाकरेंची पुन्हा सत्ताधाऱ्यांवर टीका

राज ठाकरेंची पुन्हा सत्ताधाऱ्यांवर टीका
www.24taas.com, झी मीडिया, बीड

यावर्षीचा दुष्काळ सरकारच्या नाकर्तेणामुळे आला असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. ते बीडमध्ये बोलत होते.

मनसेतर्फे दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या, पाणवठे तसेच प्रत्येक जिल्ह्यात गो शाळा सुरु करणार असल्याची माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली. बीड जिल्ह्यातील नायगाव येथील मयुर अभयारण्याला राज यांनी भेट दिली. आशिया खंडातील हे एकमेव मयुर अभयारण्य आहे.



दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची राज यांनी पाहणी. स्थानिक रहिवाशांबरोबर चर्चाही केली. पडलसिंगी येथील मनसेच्या चारा छावणीला भेट देवून राज यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

First Published: Saturday, May 4, 2013, 20:09


comments powered by Disqus