Last Updated: Tuesday, December 18, 2012, 22:06
www.24taas.com, औरंगाबादऔरंगाबादेत आज हज हाऊसच्या प्रश्नाने आक्रमक वळण घेतलं. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत मुस्लिम संघटनाचं ‘हज हाऊस’साठी आंदोलन सुरु आहे. त्यात आता आरपीआयने उडी घेतली आहे.
आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आज ही वादग्रस्त जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरपीआयचे कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट सुद्धा झाली. सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मुळात शासकीय कला महाविद्यालय़ाच्या समोर असलेल्या या जागेवर महापालिकेनं वंदे मातरम सभागृह बांधण्याचा निश्चय केला आहे.
मात्र काही मुस्लिम संघटनाची हीच जागा हज हाऊसला देण्याची मागणी आहे. यासाठी 3 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. रिपाइंने देखील यामध्ये आता सहभाग घेतला असून ही जागा ‘हज हाऊस’साठी मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहे.
First Published: Tuesday, December 18, 2012, 22:06