औरंगाबाद पालिकेतील शिवसेना-भाजप वाद मावळणार , Shiv Sena vs BJP in aurangabad

औरंगाबाद पालिकेतील शिवसेना-भाजप वाद मावळणार

औरंगाबाद पालिकेतील शिवसेना-भाजप वाद मावळणार
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेच्या सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीमध्ये सरतं वर्षही वादानंच मावळणार असं चित्र आहे. २०१३ ची शेवटची सर्वसाधारण सभा आज होणार आहे. मात्र महापौरांवर आरोप करत या सभेवर भाजपने बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

महापौरांच्या विरोधात आता भाजप नेत्यांनीच बंड केलंय.. महापौर कुठलाही निर्णय़ घेताना युतीतील घटक पक्ष म्हणून भाजपला मोजतच नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे या वर्षात आज होणा-या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा भाजपच्या 15 नगरसेवकांनी घेतलाय.. वादाच्या तत्कालीन कारणांमध्ये संतसृष्टीच्या भूमिपूजनासाठी गोपीनाथ मुंडे यांचे निमंत्रणाचे पत्र महापौर कला ओझा यांनी अडवल्याचा आरोप आहे.

विकासकामांच्या संचिका भाजपला विश्वासात न घेता आयुक्तांच्या मदतीने शिवसेना तडीस लावत असल्याचीही तक्रार आहे. शिवाय जैवविविधता व्यवस्थापन समिती सदस्य निवडीत भाजपला कुणी विचारलही नसल्याचा आरोप आहे. शिवसेना नेते फक्त स्वताच्या वार्डातच लक्ष देतात आणि या सगळ्या प्रकारासाठी महापौरच जबाबदार असल्याचा आरोप होतोय. तर शिवसेना सगळ्यांनाच सोबत घेऊन चालत असल्याचं सांगत शिवसेनेनं सारवासारव सुरु केली आहे.

या दोन्ही पक्षांच्या भांडणात शहराचा विकास मात्र ठप्प झाला आहे.. निवडणूकावेळी शिवसेनेनं वचननामा प्रसिद्ध केला होता त्यातील एकही काम पूर्ण झालं नाहीये. महापौरांना वाचवण्याच्या नादात शिवसेनेला फटका बसण्याचीच शक्यता आहे..



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 31, 2013, 07:50


comments powered by Disqus