भाविकांच्या टेम्पोला अपघात, सहा ठार, Six killed in accident bead

भाविकांच्या टेम्पोला अपघात, सहा ठार

 भाविकांच्या टेम्पोला अपघात, सहा ठार
www.24taas.com, झी मीडिया, बीड

पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या टेम्पोला बीड-अहमदनगर मार्वगावर झालेल्या अपघातात सहा जण ठार झालेत. तर २० जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

भाविकांच्या टेम्पोची मोटरसायकलला मागून धडक बसली. त्यानंतर टेम्पो पलटी झाल्याने टेम्पो मधील पाच जण ठार झाले. तर मोटरसायकल चालक जागीच ठार झाला.

पाटोदा तालुक्यातील आणि नागेशवाडीचे भाविक पंढरपूरला निघाले होते. येवलवाडीजवळ टेम्पोची मोटरसायकलला धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती, की त्यामुळे टेम्पो चक्क पलटी झाला.

या जखमी पैकी जामखेडच्या सरकारी रुग्णालयात चार जणांचा मृत्यू झाला. आणखी एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातात पारुबाई करपे या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मोटर सायकल चालक सागर रोकडे यांचाही जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोतील २० जण जखमी झाले. यामध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 19, 2013, 16:04


comments powered by Disqus