Last Updated: Sunday, May 12, 2013, 16:04
www.24taas.com, झी मीडिया,लातूर चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे शुक्रवारी झालेल्या बसमधील स्फोट हा फटाके आणि शोभेच्या दारूमुळे झाल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज सांगितले.
या प्रकरणी फटाक्यांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केल्याचेही पाटील यांनी सांगितले. बसमध्ये झालेला हा स्फोट अपघात आहे, की घातपात याबाबत चर्चा सुरू होती. याला आता पूर्णविराम मिळाला आहे. या स्फोटातील वस्तूचे नमुन्यांची फॉरेन्सिक लॅबला तपासणी करण्यात आल्यानंतर स्फोट फटाके आणि शोभेच्या दारूमुळे झाल्याचे लॅबच्या अहवालात स्पष्ट झाले.
बसस्थानकात शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बसमध्ये झालेल्या स्फोटात १९ जण जखमी झाले होते. त्यातील पाच जण गंभीर जखमी आहेत. एसटी बसमध्ये स्फोट झाल्याचे भीतीचे वातावरण होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 12, 2013, 16:04