महिलेच्या ब्रेस्ट इंप्लांट सर्जरीत चूक, झाला स्फोट

Last Updated: Thursday, June 19, 2014, 17:05

एका महिलेच्या स्तनात स्फोट झाला, ही काय मस्करी नाही हा अपघात आहे. एका महिलेने आपल्या ब्रेस्टचा आकार वाढविण्यासाठी ब्रेस्ट इंप्लांट सर्जरी करीत होती. त्याचवेळी एक स्फोट झाला. ही दुर्घटना इंग्लडच्या एका जीम इंस्ट्रक्टर सोबत झाली.

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदचा मृत्यू

Last Updated: Friday, June 13, 2014, 09:52

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद फणसेचा मृत्यू झालाय. जे. जे. रुग्णालयात मृत्यू झालाय. विशेष टाडा न्यायालयानं त्याला शिक्षा सुनावली होती. मुंबईत आरडीएक्स आणण्याची जबाबदारी दाऊद फणसेकडे होती. न्यायालयात त्यानं गुन्हा कबुल केला होता.

याकूब मेमनच्या फाशीला सुप्रिम कोर्टाची स्थगिती

Last Updated: Monday, June 2, 2014, 14:58

याकूब मेमनच्या फाशीवर सुप्रिम कोर्टानं स्थगिती दिली आहे. याकूब मेमनचा दयेचा अर्ज दहा दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींनी फेटाळला होता. याकूबची याचिका आता घटना पीठाकडे विचारार्थ पाठवण्यात आलाय. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी ठोठावण्यात आलेला याकूब मेमन एकमेव आरोपी आहे.

करिष्मा आणि संजयच्या मदतीला धावला सैफ!

Last Updated: Monday, June 2, 2014, 10:14

बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि तिचा नवरा संजय कपूर आता एकमेकांच्या सहमतीनं घटस्फोट घेणार आहे. दोन्ही मुलांच्या कस्टडीसाठी संजयनं केलेला अर्ज आता त्यानं वापस घेतलाय. दोघांनी मुंबईतल्या वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केलाय. कोर्टानं शनिवारी तब्बल 6 तास दोघांसोबत मीटिंग घेतल्यानंतर हा निर्णय त्यांनी घेतला.

याकूब मेमनच्या फाशीवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब!

Last Updated: Thursday, May 22, 2014, 08:23

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन याची दया याचिका फेटाळून लावलीय.

नायझेरियामध्ये दोन बॉम्बस्फोटात 118 ठार

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 10:46

नायझेरियामध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 118 लोक ठार झालेत. पहिला बॉम्बस्फोट हा गजबजलेल्या एका मार्केटमध्ये झाला तर दुसरा हॉस्पीटलच्या बाहेर झाला. यामध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत.

सात करोड घेऊन करिश्मा सोडणार मुलांचा ताबा?

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 08:29

अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पती बिझनेसमन संजय कपूर यानं आपल्या दोन मुलांच्या कस्टडीसाठी बांद्रा फॅमिली कोर्टात नवी याचिका दाखल केलीय.

पत्नीनं कार चालवली म्हणून पतीचा घटस्फोट

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 16:34

सौदी अरब देशात कार चालवतांनाचा व्हिडिओ काढून नवऱ्याला सरप्राईज देण्याचा प्रयत्न पत्नीवरच उलटा पडला. कारण तिच्या नवऱ्यानं तिनं देशात महिलांना वाहन चालवण्यावर असलेल्या बंदीचं उल्लंघन केलं म्हणून आणि सामाजिक परंपरा तोडली म्हणून थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय.

घटस्फोटाचा अर्ज आणि सुझान अर्जुनसोबत पार्टीत दंग

Last Updated: Monday, May 5, 2014, 19:45

सुझान खानने अभिनेता ऋतिक रोशन सोबत घटस्फोटाचा अर्ज दाखल केलाय.

सांगलीत गॅस सिलिंडर स्फोटात 6 ठार, 1 जखमी

Last Updated: Saturday, May 3, 2014, 11:47

सांगली शहरातल्या वारणाली भागात गॅस सिलिंडरचा स्फोट झालाय. या दुर्घटनेत चव्हाण कुटुंबातले सहा जण ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झालाय. दोन जखमींना बाहेर काढण्यात यश आलं.

चेन्नईत स्फोट, दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता

Last Updated: Thursday, May 1, 2014, 15:41

चेन्नईत मध्य रेल्वेच्या स्थानकावर दोन स्फोट झाले आहेत. यामध्ये किमात एक ठार तर दहा जण जखमी झालेत. दक्षिण रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटात एक महिला ठार झाली. तपासासाठी श्वान पथक बोलविण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी गाडीमध्येच लपून बसलेल्या एका संशयीताला अटक करण्यात आले असून हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

चेन्नईत मध्य रेल्वे स्थानकावर दोन स्फोट, महिला ठार

Last Updated: Thursday, May 1, 2014, 09:58

चेन्नईत मध्य रेल्वेच्या स्थानकावर दोन स्फोट झाले आहेत. यामध्ये किमात सात जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दक्षिण रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटात एक महिला ठार झाली. तपासासाठी श्वान पथक बोलविण्यात आले.

घटस्फोटामुळं एकानं ६ जणांना कारनं चिरडलं

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 08:26

चीनच्या एका दक्षिण-पूर्व शहरात आपल्या घटस्फोटामुळं चिंताग्रस्त असलेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीनं विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या एका ग्रृपला आपल्या कारनं उडवलं. यात तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झालाय. तर १३ इतर लोक जखमी झाले आहेत.

राहुल महाजन दुसऱ्यांदा घटस्फोटासाठी तयार?

Last Updated: Friday, April 25, 2014, 17:04

स्वर्गीय भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आलाय... राहुल पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण आहे त्याची वैवाहिक जीवनातील घडामोडी...

माओवाद्यांनी केलेल्या सुरुंग स्फोटात आठ ठार

Last Updated: Friday, April 25, 2014, 10:56

झारखंडमधल्या दुमकामध्ये संदिग्ध माओवाद्यांनी केलेल्या सुरुंग स्फोटात सहा निवडणूक कर्मचारी आणि दोन पोलीस शहीद झालेत.

शरद पवार - राज ठाकरेंबाबत मनोहर जोशींचा बॉम्बगोळा

Last Updated: Saturday, April 19, 2014, 19:48

२००९च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शिवसेनेसोबत युती करायची होती, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलाय.

सीरियात कार बॉम्बस्फोटात २५ ठार

Last Updated: Thursday, April 10, 2014, 16:34

सीरियामध्ये आज दोन कार बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या स्फोटाता कमीत कमी २५ लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.

बँकॉकमध्ये दुसर्‍या महायुद्धातील बॉम्ब फुटला, ७ ठार

Last Updated: Thursday, April 3, 2014, 10:06

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बुधवारी एका भंगार दुकानात दुसर्‍या महायुद्धातील जिवंत बॉम्बचा स्फोट होऊन सात कामगार ठार झाले तर १९ जण गंभीर जखमी झाले.

युक्ता मुखीचा कायदेशीर घटस्फोट

Last Updated: Thursday, March 27, 2014, 11:21

माजी विश्‍व सुंदरी आणि अभिनेत्री युक्ता मुखी आणि प्रिन्स टुली यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. हे दोघे कायदेशीर विभक्त झाले आहेत. दोघांमध्ये झालेल्या कराराला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलीय.

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी स्फोटात एक ठार

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 08:33

अंबरनाथच्या मोरीवली MIDCमध्ये अनथा ऑरगॅनिक्स कंपनीमध्ये केमिकलचा स्फोट होउन भीषण आग लागली. यात कंपनीचे मालक सी. नायारण (63) जागीत ठार झालेत. तर पाच जण गंभीर जखमी झालेत. आगीत कंपनी पूर्णपणे जाळून खाक झालीये.

`सुझान`नंतर आई-वडिलांपासूनही विभक्त झाला हृतिक!

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 12:03

सुझानपासून वेगळं झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन याच्या वैयक्तिक जीवनात निर्माण झालेलं वादळ काही शांत होताना दिसत नाहीय. आपल्या मुलांपासून वेगळं राहणाऱ्या हृतिकनं आता स्वत:ला आपल्या मात्या-पित्यापासूनही तोडलंय.

सानिया मिर्झा देणार शोएबला घटस्फोट?

Last Updated: Friday, March 14, 2014, 12:06

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात तणाव असल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सानिया मिर्झा शोएबला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. दोघं मागील अनेक काळापासून एकमेकांना भेटले सुद्धा नाहीयेत.

अमेरिकेत इमारतीत मोठा स्फोट; 11 जण जखमी

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 21:17

अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात एका इमारतीत आग लागल्यानंतर मोठा स्फोट झालाय. या स्फोटामुळं इमारतीचा काही भाग कोसळलाय. बॉयलर किंवा गॅसमुळं हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत 11 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ऋतिक आणि सुझानला `टॅटू` पुन्हा एकत्र आणणार?

Last Updated: Friday, March 7, 2014, 19:41

बॉलिवूडचा सुपरहिरो क्रिश म्हणजेच ऋतिक रोशन आणि सुझान खान यांना वेगळं होऊन आता दोन महिन्यांहून अधिक काळ लोटलाय. या दरम्यान सुझाननं आपल्या हातावर एक टॅटू गोंदवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. सुझानला तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत वांद्रे परिसरात बघण्यात आलं. तेव्हा तिच्या हातावर `फॉलो यू` हा टॅटू गोंदलेला दिसला. फॉलो यू म्हणजे पाठलाग....

INS कोलकाता युद्धनौकेत स्फोट, एका अधिकाऱ्याचा मृत्यू

Last Updated: Friday, March 7, 2014, 16:31

मुंबईमध्ये माझगाव डॉक इथं आयएनएस कोलकाता जहाजामध्ये स्फोट झालाय. माझगाव डॉकच्या यार्ड ७०१ मध्ये गॅस गळतीमुळं हा स्फोट झालाय. यामध्ये एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, काही माझगाव डॉक कर्मचारी जखमी झालेत. सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत.

बॉम्बस्फोट होणाऱ्या देशांत भारत तिसरा

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 17:14

जगात होणाऱ्या बॉम्बस्फोटांपैकी ७५ टक्के बॉम्बस्फोट हे पाकिस्तान, इराक त्यानंतर भारतात झाल्याचे समोर आले आहे. सरकारी अहवालानुसार अफगाणिस्तान आणि सीरिया यांच्यापेक्षाही सर्वात जास्त बॉम्बस्फोट भारतात होतात हे स्पष्ट झाले आहे.

शरद पवारांचा गौप्यस्फोट, माझं एेकलं असतं तर...

Last Updated: Saturday, March 1, 2014, 09:21

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय ऐतिहासिक गौप्यस्फोट. यशवंतराव चव्हाण यांनी आपलं म्हणणं ऐकलं असतं, तर ते त्याचवेळी भारताचे पंतप्रधान झाले असते.

आपल्याच निर्णयानं सुझान-हृतिक पस्तावलेत?

Last Updated: Monday, February 24, 2014, 16:50

सुझाननं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय... आणि १७ वर्षांच्या नात्याला संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय, असं म्हणत सुझानच्या निर्णयाचा आदर राखत हृतिक आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचं धाडस तर केलं... पण, हे सत्य तो अजूनही पचवू शकलेला नाही.

"मालेगाव-समझौता बॉम्बस्फोट भागवतांच्या संमतीने"

Last Updated: Thursday, February 6, 2014, 12:56

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहमतीनंच समझोता एक्स्प्रेस, हैदराबादमधली मक्का मशीद आणि अजमेरमधल्या दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा खळबळजनक दावा या स्फोटातील आरोपी स्वामी असिमानंद यांनी केलाय.

मुलीच्या पँन्टच्या खिशात `आयफोन`चा स्फोट

Last Updated: Monday, February 3, 2014, 19:14

अमेरिकेत एका आठ वर्षीय विद्यार्थीनीच्या पँन्टच्या मागच्या खिशात ठेवलेल्या आयफोनचा स्फोट झालाय. या घटनेत ही विद्यार्थीनी गंभीर जखमी झालीय.

औरंगाबादमध्ये संशयास्पद स्फोटात ३ ठार

Last Updated: Monday, February 3, 2014, 10:15

औरंगाबादमध्ये एक वेल्डिंगच्या दुकानात संशयास्पद स्फोट झाला असून यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय, तर तिघे जण गंभीर जखमी झालेत.

ऐन प्रजासत्ताक दिनी मणीपूर बॉम्बस्फोटांनी हादरलं

Last Updated: Sunday, January 26, 2014, 15:31

मणीपूरची राजधानी इन्फाळमध्ये आज सकाळी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू असताना दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. बॉम्ब स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ९ जण जखमी झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय.

कपड्यांमध्ये आला करंट आणि `तो` भाजला

Last Updated: Thursday, January 23, 2014, 14:55

कपड्यांमध्ये आलेल्या स्टॅटिक विद्युतमुळं एका घरात चक्क गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळं घरात आग लागली आणि ७० वर्षीय चुंग हे पूर्णपणे भाजल्या गेले.

शरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण - कोर्ट

Last Updated: Thursday, January 23, 2014, 07:53

शरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. आपल्या जोडीदाराला जाणीवपूर्वक शारीरिक सुख नाकारणे हा त्या जोडीदाराचा मानसिक छळ आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ओबामा सेक्स स्कँडल, मिशेल घेणार घटस्फोट?

Last Updated: Thursday, January 16, 2014, 19:34

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वैवाहिक जीवनात एक वादळ उठले आहे. एका अमेरिकेतील वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा घटस्फोट घेण्याच्या तयारी आहे. मीडियातील वृतानुसार ओबामा पत्नी मिशेलला सोडून आपल्या मुलींसह हवाईला रवाना झाले तेव्हा दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

सलमान झाला हृतिक रोशनचा सल्लागार?

Last Updated: Thursday, January 9, 2014, 11:24

नुकताच आपल्या पत्नी सुझान खान पासून वेगळा झालेला अभिनेता हृतिक रोशन आपलं १३ वर्षांचं नातं तुटल्यामुळं दु:खी आहे. मात्र या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं यासाठी त्यानं सल्ला घेतलाय तो अभिनेता सलमान खानकडून...

सुजान खान म्हणते, अर्जुन रामपाल माझा मित्र

Last Updated: Thursday, December 19, 2013, 20:44

अभिनेता हृतिक रोशन आणि सुजान खान यांच्या काडीमोडनंतर प्रथमच सुजान मीडियाशी बोलली. अर्जुन रामपाल हा केवळ माझा मित्र आहे. आमच्या घटनेबाबत त्याला दोषी धरता कामा नये.

अर्जुन म्हणतो, हृतिक-सुझानच्या घटस्फोटाचं कारण मी नाही

Last Updated: Sunday, December 15, 2013, 14:06

अर्जुन रामपालसोबत सुरू असलेल्या प्रेमसंबंधांमुळेच सुझाननं हृतिकपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय, अशीही चर्चा सुरू होती. या चर्चेला खुद्द अर्जुन रामपालनंच पूर्णविराम दिलाय.

सुझान आयुष्यभर माझं प्रेम राहील - हृतिक रोशन

Last Updated: Sunday, December 15, 2013, 09:06

सुझान आणि ह्रतिक रोशन यांचा १३ वर्षांचा संसार संपुष्टात येणार असल्याचं आता उघड झालंय... सुझाननं हे उघड केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वैवाहिक जीवनानाबद्दल आणि सुझानबद्दल ह्रतिकनं प्रतिक्रिया दिलीय. त्यानं फेसबुकवर अजुनही आपण सुझानवर नितांत प्रेम करत असल्याचं म्हटलंय.

संजय दत्त पितो येरवडा जेलमध्ये रम आणि बिअर

Last Updated: Saturday, December 14, 2013, 16:46

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना कारागृहातील पोलीस त्याला रम आणि बिअर पाजत आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला आहे. विनोद तावडे यांनी शुक्रवारी म्हटलं की, बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला पुण्याच्या येरावडा कारागृहात रम आणि बिअर देण्यात येतेय आणि ते पोहचवण्यात काही पोलीस अधिकारी त्याला मदत करत आहे. संजय दत्तला १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली पाच वर्षाची शिक्षा सुनवण्यात आली आहे.

ज्वालामुखीच्या तोंडावर डोंबिवली

Last Updated: Friday, December 6, 2013, 23:39

डोंबिवली हे शहर भयानक ज्वालामुखीच्या तोंडावर वसलंय, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरालगत असलेल्या दावडी गावातल्या एका भंगार डेपोत केमिकलच्या टाकीचा जबरदस्त स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झालाय. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की या टाकीच्या धातूचे तुकडे तब्बल 3 किलोमीटर अंतरापर्यंत फेकले गेले. डोंबिवलीकरांना भोगाव्या लागणा-या दुष्टचक्रावर हा एक विशेष रिपोर्ट..

डोंबिवली केमिकल स्फोट : तिघांना घेतले ताब्यात, आग विझली

Last Updated: Friday, December 6, 2013, 16:14

डोंबिवलीमध्ये कल्याण शीळ फाटा रस्त्यावर असलेल्या गायवाड कंपाऊंडमधील एका भंगाराच्या गोदामात भीषण स्फोट झाला. भंगार डेपोतील केमिकलच्या टाकीचा स्फोट झाला असून या स्फोटाने तिघांचा बळी घेतलाय. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.

डोंबिवलीत केमिकल टँकमध्ये स्फोट, चार ठार

Last Updated: Friday, December 6, 2013, 12:24

डोंबिवलीमध्ये कल्याण-शीळ रस्त्यावर गायकर कंपाऊंड इथं ठेवलेल्या भंगाराच्या केमिकल टँकमध्ये भीषण स्फोट झालाय. या स्फोटात चार जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाजवळ बॉम्ब स्फोट, ६ ठार

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 10:23

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या इदिन्तकाराई या गावात गावठी बॉम्बचा स्फोट होऊन सहाजण ठार तर दोन जण जखमी झालेत. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे.

पत्नीच्या पर्समध्ये सिगारेट, पतीने दिला घटस्फोट

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 11:38

पत्नीच्या पर्समध्ये सिगारेट आढळून आल्यामुळे पतीराज एवढे संतापले की, त्यांनी पत्नीला घटस्फोट दिला. सौदी अरेबियात ही घटना घडली.

बोधगया बॉम्बस्फोटाचा तपास लावण्यात एनआयएला यश

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 10:47

बोधगया इथं झालेल्या १० साखळी बॉम्बस्फोटांचा तपास लावण्यात एनआयएला यश आलंय. या स्फोटांमागं इंडियन मुजाहिदीनच्या रांची मॉडेलचा हात असल्याचं एनआयएनं स्पष्ट केलंय.

पाटणा बॉम्बस्फोट : कुटुंब असूनही बेवारस ‘तारिक’चा दफनविधी!

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 11:39

पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी तारिक ऊर्फ एनुल यांच्या मृत्यूनंतर त्याचं शव ताब्यात घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी नकार दिला. त्यानंतर त्याच्यावर बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कमिटीनं त्याचा दफनविधी पार पाडला.

मोदींची सुरक्षा वाढली, पंजाबच्या प्रचारसभेतही घातपाताची शक्यता?

Last Updated: Monday, November 4, 2013, 12:52

पाटणातल्या स्फोटानंतर नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत पुन्हा घातपात होण्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागानं पंजाब पोलिसांना याबाबात इशारा दिला आहे.

नरेंद्र मोदींचं मिशन, पाटण्यामध्ये सांत्वन

Last Updated: Saturday, November 2, 2013, 22:45

पाटणा येथे झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची नरेंद्र मोदींनी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच भाजपच्या वतीने त्यांनी मृतांच्या वारसास पाच लाखांचा चेकही दिला.

पाटणा बॉम्बस्फोट : मुख्य संशयित आरोपी तारिकचा मृत्यू

Last Updated: Friday, November 1, 2013, 16:32

पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं बॉम्बस्फोटाच्या चौकशीला मोठा धक्का बसलाय.

एक्सक्लुझिव्ह : पाटणा बॉम्बस्फोटात `आयएसआय`चा हात!

Last Updated: Thursday, October 31, 2013, 16:56

बिहारची राजधानी पटना इथं नुकत्याच झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटासाठी आर्थिक मदत आयएसआय पाठवल्याचा खुलासा झालाय.

‘रज्जो’ची मोहिनी गृहमंत्र्यांना भारी पडणार?

Last Updated: Thursday, October 31, 2013, 13:43

पाटण्या बॉम्बस्फोटाची बातमी कळल्यानंतरही गृहमंत्र्यांनी ‘रज्जो’ या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चिंगला प्राधान्य दिलं. पण, त्यामुळे गृहमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षतेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत.

मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, ३ ठार

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 10:48

मणिपूरच्या पश्चिम इंफाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर यीसकुल भागात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या बॉम्बस्फोटात तीनजण ठार आणि सातजण जखमी झाले आहेत. जखमींना आरआयएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलंय.

कसं झालं पाटणा बॉम्बस्फोटाचं प्लानिंग?

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 13:28

पाटण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या झालेल्या सभेच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. स्फोटासाठी अनेक दिवसांपासून प्लानिंग सुरू असल्याचं मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होतंय.

केंद्रीय गृहमंत्र्यांना ‘रज्जो’ची मोहिनी!

Last Updated: Monday, October 28, 2013, 10:34

केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेना ‘रज्जो’नं मोहिनी घातलीय. त्यामुळंच की काय रविवारी गृहमंत्री रज्जोच्या म्युझिक लाँचला पोहचले.

पाटणा स्फोट: १३ संशयीत ताब्यात, इंडियन मुजाहिद्दीनवर संशय

Last Updated: Monday, October 28, 2013, 10:14

नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीआधी पाटणामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा संशय आहे.

पाटण्यातील बॉम्बस्फोटांमागे षडयंत्र- नीतिश कुमार

Last Updated: Sunday, October 27, 2013, 19:44

पाटण्यातमधे झालेल्या स्फोटांमागे बिहारमधलं सामाजिक वातावरण बिघडवण्याचं षडयंत्र असल्याचा संशय मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी व्यक्त केलाय.

मोदींच्या ‘हुंकारा’आधी पाटण्यात साखळी बॉम्बस्फोट

Last Updated: Sunday, October 27, 2013, 13:05

एकामागून एक आठ साखळी स्फोटांनी पाटणा हादरलंय. पहिला स्फोट पाटणा रेल्वे स्टेशनवर दोन आणि गांधी मैदानाजवळ सहा स्फोट झालेत. याच गांधी मैदानावर मोदींची सभा होणार आहे.

संजय दत्तची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रातून हालचाली

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 17:41

१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून हालचाल सुरू असल्याची माहिती मिळतेय.

रशियातील लाईव्ह बॉम्बस्फोट कॅमेऱ्यात कैद

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 12:00

कॅमेऱ्यात कैद झालाय बॉम्बस्फोटा सारखा आत्मघाती हल्ला. हा हल्ला झालाय रशियात. रशियातील वोल्गोग्रँड शहरात एका बस मध्ये हा आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे.

बगदादच्या कॅफेमध्ये आत्मघातकी स्फोट, ३७ जण ठार

Last Updated: Monday, October 21, 2013, 10:21

इराकची राजधानी बगदाद इथं काल रात्री आत्मघातकी स्फोट झाला. स्फोटकांनी भरलेली कार उडवून देण्यात आली. या स्फोटात ३७ जण ठार झाले आहेत. तर देशातल्या इतर ठिकाणी घडलेल्या हिंसक घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झालाय.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद

Last Updated: Thursday, October 17, 2013, 09:45

ग़चिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. कुरखेडा तालुक्यातल्या झरी गावातल्या जंगलात ही घटना घडलीय. काल रात्री नक्षलविरोधी अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला.

पत्नीने शरीरसंबंधांना नकार दिला तर घटस्फोट शक्य - हायकोर्ट

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 20:54

विवाहातील सर्वात महत्त्वाचा घटक हा शरीरसंबंध आहे, जर विवाहानंतर पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला तर पतीला पत्नीकडे घटस्फोट मागता येऊ शकेल, असा ऐतिहासिक निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला आहे

लॉस एंजिलिसच्या विमानतळावर ड्राय आईसचा स्फोट

Last Updated: Monday, October 14, 2013, 20:13

ड्राय आईसच्या एका प्लॅस्टिकच्या बाटलीचा स्फोट झाल्यानं आज लॉस एंजिलिसच्या चार विमानांचं उड्डाणं रद्द करावं लागलं. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच घडलाय.

पाकिस्तान: पेशावरला चर्चमध्ये मानवी बॉम्ब फुटला- ४० ठार, ४५ जखमी

Last Updated: Sunday, September 22, 2013, 15:33

भीषण आत्मघातकी स्फोटानं पाकिस्तान हादरलंय. पेशावरमधील एका चर्चमध्ये आत्मघातकी स्फोट झालाय. स्फोटात ४० जण ठार झाले असून ४५ जण जखमी झाले आहेत.

पोलिसांना चकवा देऊन ‘आयएम’चा दहशतवादी फरार

Last Updated: Friday, September 20, 2013, 18:35

मुंबई सेशन्स कोर्टात आज एक धक्कादायक घटना घडलीय. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा अफजल उस्मानी हा दहशतवादी फरार झालाय.

कोण आहे करिश्मा कपूरचा नवा मित्र?

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 12:04

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोट होऊन आता अनेक दिवस उलटलेत. पण, आता करिश्माच्या आयुष्यात एका नव्या मित्राची एन्ट्री झालीय.

कोलकात्यात क्रूड बॉम्बचा स्फोट!

Last Updated: Friday, August 30, 2013, 19:54

कोलकात्याच्या चांदणी चौक परिसरात आज दुपारच्या सुमारास स्फोट झाला. क्रूड बॉम्बच्या साहाय्यानं हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात आलंय.

अमेरिका नौसेनेच्या केंद्रात स्फोट, आठ जखमी

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 11:13

अमेरिकेच्या न्यूजर्सी येथील नौसेनेच्या केंद्रात मंगळवारी झालेल्या स्फोटात आठ लोकं जखमी झाल्येत.या भयंकर स्फोटात घायाळ झालेल्यापैकी एक गंभीर जखमी असून स्फोटाचं कारण शोधलं जातय.

पाच जणांचे मृतदेह बाहेर, घातपाताची शक्यता - सेना

Last Updated: Saturday, August 17, 2013, 09:04

सिंधुरक्षक दुर्घटनेमागे घातपात असल्याची शक्यता शिवसेनेनं व्यक्त केलीये. या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. तसंच संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

सिंधुरक्षकच्या स्फोट : पाणबुडीतील सर्व नौसैनिकांचा मृत्यू!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 18:05

स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधीच मुंबईत भीषण नौदल दुर्घटना घडली आहे. नौदलाची 16 वर्ष जुनी सिंधूरक्षक या पाणबुडीमध्ये जबर स्फोट होऊन विध्वंसक आग लागली. आगीमुळे ही पाणबुडी बुडाली असून, त्यावरील तीन अधिका-यांसह 15 नौसेनिंकांचा मृत्यू झालाय.

नौदलाच्या पाणबुडीवर स्फोट, १८ कर्मचारी बेपत्ता

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 10:46

मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये मंगळवारी रात्री भीषण दुर्घटनेमुळं अफरातफर माजली. नौदलाच्या INS सिंधुरक्षक पाणबुडीला आग लागल्याच्यावृत्तानं सुरक्षा यंत्रणांचं धाबं दणाणलं. पाणबुडीमध्ये झालेल्या या भीषण स्फोटानंतर नौदलाचे किमान 18 कर्मचारी बेपत्ता असल्याचं समजतंय.

बॉम्बस्फोटाला वर्ष उलटलं; बॉम्बसूट कधी मिळणार?

Last Updated: Thursday, August 1, 2013, 11:22

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण होतंय. स्फोटाच्या तपासाबाबत राज्याच्या सुरक्षा यंत्रणांची पाटी कोरीच आहे

गुवाहाटीमध्ये पोलीस स्टेशनजवळ स्फोट

Last Updated: Monday, July 29, 2013, 07:36

गुवाहाटीतल्या रेल्वे स्थानकानजीकच्या गजबजलेल्या फलटन बाजारात पोलिस स्टेशनच्या बाहेर झालेल्या ग्रेनेडच्या स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत.

घटस्फोट : पत्नीला पतीच्या `वडिलोपार्जित` संपत्तीतही वाटा!

Last Updated: Thursday, July 18, 2013, 09:15

लग्न आणि घटस्फोटासंदर्भातले कायदे विशेषतः महिलांच्या दृष्टीनं सुटसुटीत होणार आहेत. घटस्फोट घेताना पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीतही पत्नीला वाटा मिळू शकेल.

मुलीच्या पँटमध्ये झाला सॅमसंग गॅलेक्सी S3 चा स्फोट

Last Updated: Thursday, July 11, 2013, 17:24

एक मुलीच्या पँटमध्ये स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस३ मोबाईलचा अचानक स्फोट झाला. यामुळे ती मुलगी जखमी झाली आहे. या मुलीने सॅमसंग विरोधात कोर्टात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढचं टार्गेट ‘मुंबई’ – इंडियन मुजाहिद्दीन

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 12:30

बिहारच्या बोधगयास्थित महाबोधी मंदिरात रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेनं स्विकारलीय.

बुद्धगया बॉम्बस्फोट: आणखी चार अटकेत

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 12:41

बिहारमधलं बुद्धगया मंदीर रविवारी साखळी स्फोटाने हादरलं. या मंदिरात झालेल्या स्फोटानं सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या

महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेत वाढ

Last Updated: Tuesday, July 9, 2013, 17:05

बुद्धगयेला झालेल्या साखळी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.

बोधगया बॉम्बस्फोट : सीसीटीव्ही फुटेज जाहीर

Last Updated: Monday, July 8, 2013, 11:32

बुद्धगयामधील स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करण्यात आलंय. बिहार पोलीसांनी हे फुटेज प्रसिद्ध झालंय.

बुद्धगया साखळी स्फोटाची पूर्वसूचना, तरीही हलगर्जीपणा!

Last Updated: Sunday, July 7, 2013, 22:18

बिहारमधलं बुद्धगया मंदीर आज साखळी स्फोटाने हादरलं. या मंदिरात झालेल्या 9 स्फोटानं सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. या स्फोटाची पूर्वसुचना आयबीनं दिली होती अशी माहिती आता समोर आलीय.

बोधगया बॉम्बस्फोटाचं पुणे कनेक्शन?

Last Updated: Sunday, July 7, 2013, 16:10

बोधगया साखळी स्फोट प्रकरणी ‘झी मीडिया’च्या हाती धक्कादायक माहिती लागलीय. या स्फोटांचे पुणे कनेक्शन समोर आलंय.

‘बोधगयावर हल्ला दहशतवाद्यांकडूनच...’

Last Updated: Sunday, July 7, 2013, 12:49

बिहारमध्ये रविवारी पहाटे पहाटे झालेले साखळी बॉम्बस्फोट हे दहशतवाद्यांनीच घडवून आणले, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलंय.

बोधगया मंदिराजवळ नऊ साखळी स्फोट...

Last Updated: Sunday, July 7, 2013, 09:32

रविवारी पहाटे पहाटे बिहारस्थित बोधगया महाबोधी मंदिराचा परिसर एकापाठोपाठ झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे हादरलाय.

खोपोलीत स्टील कंपनीत स्फोट, १० जखमी

Last Updated: Saturday, July 6, 2013, 12:38

रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधल्या इंडिया स्टील कंपनीच्या भट्टीमध्ये काल रात्री भयंकर स्फोट झाला. यात १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटानंतर वितळलेल्या लोखंडाचे तीन गोळे बाजूच्या वस्तीच्या दिशेनं फेकले गेले.

काबूलमध्ये राष्ट्रपतींच्या घरावर तालिबानी हल्ला...

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 10:10

काबूलमध्ये स्फोट आणि गोळीबारासारख्या घटनांना पुन्हा एकदा सुरुवात झालीय. पोलिसांनी हा हल्ला दहशतवाद्यांकडूनच झाल्याचं कबूल केलं असलं तरी या घटनेबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

सिरियात आत्मघातकी कार बॉम्बस्फोट

Last Updated: Monday, June 17, 2013, 11:24

दमिस्कसमध्ये एका सैनिकी विमानतळाजवळील सैन्य चौकीवर झालेल्या कार बॉम्बस्फोटात काही जवान मृत्युमुखी पडलेत तर २० जवान जखमी झाल्याची माहिती ‘मानवी हक्क आयोगाच्या’ सिरियन निरीक्षकांनी दिलीय.

मोबाईलचा तोंडात स्फोट, युवक गंभीर

Last Updated: Sunday, May 26, 2013, 11:55

मध्यप्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात घुरवाड़ा गावामध्ये तोंडात मोबाईलचा स्फोट झाल्याने २२ वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला. या मोबाईलच्या स्फोटात त्याच्या झोपडीचे छतही उडाले.

गौप्यस्फोट: चेन्नईच्या मालकाचा जावईही गोत्यात?

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 14:03

विंदूचे BCCIचे अध्यक्ष आणि CSKचे मालक श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यपन याच्या संपर्कात असल्याचे त्याच्या चौकशीतून बाहेर आले आहे.

संजय दत्तची येरवड्यात रवानगी

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 09:55

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी संजय दत्त याला आज पहाटे आर्थर रोडमधून येरवडा जेलमध्ये हलवण्यात आलंय. गुरुवारी, १६ मे रोजी त्यानं टाडा कोर्टासमोर शरणागती पत्करली होती.

फेसबुकमुळे होऊ शकतो घटस्फोट...

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 16:12

एखाद्या सोशल साइटवरून पती-पत्नीमध्ये वाद उद्भवू शकतील आणि ते प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत जाईल, असा विचार दहा वर्षांपूर्वी कुणी केला असता? कदाचित नाही; परंतु अशी प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत.

संजय दत्तची मागणी, टाडा कोर्टाचे सीबीआयला निर्देश

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 20:00

अभिनेता संजय दत्तनं येरवडा जेलमध्ये शरण येण्याची परवानगी मिळावी यासाठी टाडा कोर्टात याचिका दाखल केलीय. संजय दत्तची मागणी मान्य करणे शक्य आहे का, याबाबत टाडा कोर्टाने सीबीआयला निर्देश दिले आहेत. तसंच उद्यापर्यंतच म्हणणं मांडण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.

बसमधील स्फोट फटाक्यांमुळेच - आर आर

Last Updated: Sunday, May 12, 2013, 16:04

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे शुक्रवारी झालेल्या बसमधील स्फोट हा फटाके आणि शोभेच्या दारूमुळे झाल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज सांगितले.

चित्रांगदा सिंग घेणार घटस्फोट...

Last Updated: Saturday, May 11, 2013, 22:09

अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिनं आणि तिचा पती गोल्फपटू ज्योती रंधावा यांनी अखेर घटस्फोटाचा निर्णय घेतलाय. त्यासाठी तिनं गुरगाव न्यायालयात अर्जदेखील सादर केलाय.

लातूर-उदगीर एसटीत स्फोट, १९ जण जखमी

Last Updated: Friday, May 10, 2013, 21:18

लातूर उदगीर मार्गावरील नळेगाव येथील बस डेपोमध्ये आज सायंकाळी एसटीमध्ये स्फोट होऊन १९ जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा मृत्यू

Last Updated: Monday, May 6, 2013, 10:27

१९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिका खटल्यातील आरोपी इसाक मोहम्मद हजवाने याचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

पुत्ररत्न झाल्याने तिसऱ्या दिवशीच लग्नाचा काडीमोड

Last Updated: Monday, May 6, 2013, 09:14

लग्नानंतर तीनच दिवसात पुत्ररत्न झाल्याची घटना धुळ्यात घडल्याने गावात चांगलीच चर्चा सुरू झालीय. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे २ मे रोजी लग्न झालेल्या नववधूने ४ मे रोजी रात्री मुलास जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली.

फेसबुकवर प्रेम, लग्न आणि ४८ तासात घटस्फोटही

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 17:53

एका प्रेमी युगलांचे फेसबुकच्या माध्यमातून प्रेम जडले. एका आठवड्यात लग्नही झालं आणि ४८ तासात घटस्फोटही झाला.

घटस्फोट घेण्याची विचित्र परंपरा

Last Updated: Friday, April 26, 2013, 16:11

मलायाच्या सुदूर जंगलीत वास्तव्य करणाऱ्या आदिवासींमध्ये घटस्फोट घेण्याची विचित्र परंपरा आहे. एखाद्याला स्वत:च्या पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल तर, त्याला आपल्या संपूर्ण समुहातील लोकांना निमंत्रित करावे लागते.

कॉम्युटरचा स्फोट, विद्यार्थ्याला गमवावा लागला हात

Last Updated: Thursday, April 25, 2013, 16:29

एखादा चीनी बनावटीचा मोबाइल किंवा खेळण्याचा स्फोट होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. मात्र आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला संगणकही सुरक्षित नसल्याचं एका घटनेनं स्पष्ट झालंय.