Last Updated: Wednesday, November 14, 2012, 11:02
www.24taas.com,बीड स्त्री भ्रूण हत्यांप्रकरणी अटकेत असलेल्या बीडचा डॉक्टर डेथ सुदाम मुंडेला सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिलाय. त्यामुळे मुंडेला सहामहिने जेलची हवाच खावी लागणार आहे.
कोर्टानं सुदाम मुंडेचा जामीन अर्ज फेटाळलच शिवाय सहा महिन्यानंतरच त्याला जामिनासाठी मुंडेंना अर्ज करता येईल असे निर्देश दिले. त्यामुळं सहा महिने मुंडेला जामीन नाही हे आता निश्चित झालयं.
मे महिन्यात विजयमाला पाटेकर या गर्भवती महिलेचा गर्भपात करताना रक्तस्त्राव झाल्यानं मृत्यू झाला होता. घटनेच्या तीन आठवड्यानंतर मुंडे दांपत्याला अटक झाली होती. अटक झाल्यानंतर मुंडे दांपत्यानं जामिनासाठी अर्ज केलं होते. मात्र कोर्टानं त्यांना जामीन दिला नव्हता.
सुदाम मुंडेला सहा महिने तरी तुरुंगातच काढावे लागणार हे आता निश्चित झालयं. सुदाम मुंडेची बायको डॉक्टर सरस्वती मुंडेला मात्र कोर्टानं थोडाफार दिलासा दिलाय. मुंडे दांपत्याचं प्रकरण सध्या ज्या कोर्टाच्या कक्षेत आहे. ते कोर्ट सरस्वती मुंडेच्या जामिनाचा निर्णय़ घेऊ शकते असंही सुप्रीम कोर्टानं म्हटल आहे.
First Published: Wednesday, November 14, 2012, 10:47