सुप्रीम कोर्टाचा दणका, सुदाम मुंडे जेलमधेच

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 11:02

स्त्री भ्रूण हत्यांप्रकरणी अटकेत असलेल्या बीडचा डॉक्टर डेथ सुदाम मुंडेला सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिलाय. त्यामुळे मुंडेला सहामहिने जेलची हवाच खावी लागणार आहे.

डॉ. सरस्वती मुंडेला जामीन मंजूर

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 13:44

बीडमधल्या विजयमाला पट्टेकर मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. सरस्वती मुंडेंला सशर्त जामीन मंजूर झालाय. तीन लाखांच्या जातमचुलक्यावर अंबाजागोई सत्र न्यायालयानं सरस्वती मुंडेंला जामीन मंजूर केलाय.

डॉ. सुदाम मुंडेवर आरोपपत्र दाखल

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 14:29

परळीच्या डॉ. सुदाम मुंडेवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. महिलेचा गर्भपात करताना तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप डॉक्टर मुंडेवर करण्यात आलाय.

सरकाराला सुप्रिया सुळेंचा घराचा आहेर!

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 20:23

बीडमधल्या परळीत स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणांतला आरोपी सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी 26 दिवस फरार राहणं हे राज्य सरकारचं अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय....

फरार डॉ. मुंडेचे पाच राज्यांत वास्तव्य

Last Updated: Monday, June 18, 2012, 09:53

परळीतील बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणी फरार झालेला डॉ. सुदाम मुंडे अखेर पोलिसांना शरण आलाय. मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांनी परळीतल्या पोलीस स्टेशनसमोर हजेरी लावली. पोलिसांना चकवा देत मुंडे पती-पत्नीने २६ दिवसांत तब्बल पाच राज्य पालथी घातली.

डॉ. सुदाम मुंडेची 'सपत्नीक' शरणागती

Last Updated: Sunday, June 17, 2012, 23:37

परळीतल्या स्त्री भ्रूण हत्या प्रकऱणी डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे रात्री 9 वाजता परळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. उद्या सकाळी त्यांना परळी न्यायालयात हजर करणार आहेत. मुंडे काल संध्याकाळपर्यंत परळीमध्येच होता.

बीडमध्ये गर्भपिशवी काढण्याचा धंदा

Last Updated: Monday, June 4, 2012, 19:48

डॉक्टर सुदाम मुंडे, डॉक्टर शिवाजी सानप यांच्यावरील कारवाईनंतर बीडमधल्या स्त्रीभ्रूणहत्यांचा मुद्दा पुन्हा गाजतोय. पोलिसांनी सुरु केलेल्या तपासांत अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्यात आहेत. परळी, बीडमध्ये केवळ गर्भपात, स्त्री भ्रूणहत्याच होत नाहीत, तर गर्भपिशवी काढून टाकण्याचा धंदाही इथं जोरात असल्याचं तपासात पुढे आले आहे

फरार डॉ. मुंडेकडे कोट्यवधींची माया

Last Updated: Monday, June 4, 2012, 18:56

स्त्री भ्रूण हत्येतील प्रमुख आरोपी डॉ. सुदाम मुंडे याच्याकडे कोट्यवधी रूपयांची माया सापडली आहे. तो १५० कोटी संपतीची धनी असल्याचे उघड झाले आहे. मुंडे हा अनेक दिवसांपासून फरार असल्याने त्याची माहिती देणाऱ्यासाठी ४० हजारांचे बक्षिसही जाहीर केले आहे.

डॉ. सुदाम मुंडेनी दिली पोलिसांनी तुरी

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 15:49

परळीतल्या स्त्री गर्भपात हत्येप्रकरणी फरार असलेला डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी अद्यापही पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरले आहेत. गृहमंत्री आर.आर.पाटलांनी मात्र पोलीस लवकरच मुंडेंना अटक करतील असा दावा केलाय. तर दुसरीकडं गोपीनाथ मुंडेंनीही डॉक्टर मुंडेंवर कारवाईची मागणी केली आहे.

डॉ. मुंडेचा ‘तो’ जामीन रद्द

Last Updated: Friday, May 25, 2012, 19:02

परळी बीड संशयित भ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे याला आंबेजोगाई सेशन कोर्टानं आणखी एक दणका दिलाय. २०१० साली झालेल्या गर्भपात प्रकरणात महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉ. मुंडेला दिलेला जामीन रद्द करण्यात आलाय.

बीडचं मुंडे हॉस्पिटल सील

Last Updated: Thursday, May 24, 2012, 17:15

परळीतल्या डॉ. सुदाम मुंडेचं हॉस्पिटल सील करण्यात आलंय. उपजिल्हाधिकारी, महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी ही कारवाई केली.

बीडचा डॉ. मुंडे फरार म्हणून घोषित

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 18:16

संशयित स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी परळीतील डॉ. सुदाम मुंडे आणि त्याच्या पत्नीवर पोलिसांनी पुन्हा गुन्हे दाखल केले आहेत. एव्हढंच नाही तर डे दांपत्याला पोलिसांनी फरार म्हणून घोषित केलंय.