टगेगिरीनंतर आता ताईगिरी , Supriya Sule was lighted

टगेगिरीनंतर आता ताईगिरी

टगेगिरीनंतर आता ताईगिरी
www.24taas.com, बुलडाणा

माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची टगेगिरी सर्वांनाच माहित झाली आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या ताईंची अरेरावी ही दिसून आली. खासदार सुप्रिया सुळेंची ताईगिरी येथे दिसली.

सध्या सुप्रियाताई राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या युवतींचे मेळावे घेण्यात मग्न आहेत. खा. सुळे येथे राष्ट्रवादी युवती मेळाव्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवून भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. त्यावेळी ‘ए, आवाज चढवून माझ्याशी बोलायचे नाही.’ हा खासदार सुप्रिया सुळेंचा चढलेला आवाज ऐकून त्यांच्या गाडीजवळ उभ्या असलेल्या महिलांनी ‘कोण बोलत्येय चढय़ा आवाजात. आम्ही तर अगदी साध्या शब्दात आमची भूमिका मांडत आहोत.’ असे म्हटल्यावर सुळे म्हणाल्या,‘ चला निघा आता.!’

सुप्रिया यांचा हा नवा अरेरावीतला अवतार पाहून उपस्थित सार्याळ महिला भांबावल्या. आणि सुळे कारमधून पुढे निघाल्या.
त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवून महिला कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. काळे झेंडे दाखविण्याचे कारण होते, एका
महाविद्यालयांच्या संस्थाचालकावर दबाव टाकून शाळा बंद पाडून युवती मेळाव्यास मुलींना आणण्यात आले. हा आरोप भाजपच्या महिलांनी केला आहे.

एकीकडे राज्यात युवती व महिलावर अत्याचार होत आहेत. या राज्यात महिला सुरक्षीत नाही, त्यांना संरक्षण देण्याऐवजी युवती मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजणार्यां राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध करण्यात येत असल्याचे भाजप महिला आघाडीच्या वैशाली डाबेराव, विजया राठी, प्रभाताई कविमंडन, मनिषा तरमळे, रेखा पोलाखरे, मंदा शिंगणे यांनी सांगितले.

First Published: Friday, October 12, 2012, 16:12


comments powered by Disqus