Last Updated: Monday, March 3, 2014, 16:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराष्ट्रवादीने सुरेश धस यांना बळीचा बकरा बनवल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.
सुरेश धस हे गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.
कुणीही आपल्या विरोधात उभं राहिलं तर काहीही फरक पडत नाही, असं ही गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंयय
बीडचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटलाय.
राष्ट्रवादीनं बीडमधून गोपीनाथ मुंडेंविरोधात महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांना मैदानात उतरवलंय. सुरेश धस हे एकेकाळी मुंडेंचे सहकारी होते.
मात्र त्यांनी मुंडेना जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासूनच त्यांचा मुंडेविरोध सर्वश्रूत आहे.
मुंडेंविरोधात राष्ट्रवादीकडून जयदत्त क्षीरसागर मैदानात उतरण्याची चर्चा होती. मात्र अखेर धस यांच्या नावार शिक्कामोर्तब झालंय.
यामुळं आता बीडमध्ये मुंडे, धस आणि नंदू माधव यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 3, 2014, 16:27