Last Updated: Wednesday, May 30, 2012, 19:02
विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबाद शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिकेनं आता कंबर कसली आहे. सिंगापूरच्या धर्तीवर शहरातील रस्त्यावर कचरा टाकणा-यास दंड आकारण्यात येणार आहे.. याकरीता महापालिकेचे भरारी पथकही स्थापण करण्यात येणार आहे आणि या भरारी पथकाला फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार देण्यात येणार आहे
औरंगाबादेत आता सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर अस्वच्छता करणा-यांवर महापालिकेचा बडगा पडणाराय. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका उपद्रव शोध पथक स्थापन करणाराय. हे पथक सार्वजनिक ठिकाणी घाण करणा-या लोकांवर कारवाई करणार आहे. कचरा टाकणा-यां लोकांवर पैशांच्या स्वरुपात दंडाची कारवाई करण्यासोबतच लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार या पथकाला असणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकणे नागरिकांना थेट कोठडीची हवाही दाखवू शकते. केंद्र सरकारनं स्वच्छतेच्या बाबतीत औरंगाबादला डेंजर झोनमध्य़े टाकल्यानंतर महापालिकेला जागा आली आहे.
कचरा टाकणा-यांवर दंड
उघड्यावर शौचास बसणे, लघुशंका- 25 रुपये कचरा टाकणे- 100 रुपये मासे विक्रेत्यांनी घाण टाकल्यास- 150 रुपये सलून, टेलर्स, बेकरी, फर्निचर दुकाने - 200 रुपये गूटखा खाऊन थुंकल्यास... 500 रुपये हॉटेल्स, मंगल कार्यालये, चित्रपटगृह, हॉस्पिटल- 1000 रुपये रस्त्यावर पाणी सोडल्यास - 100 रुपये तसंच दोनपेक्षा जास्त वेळेस एकाच माणसाने गुन्हा केल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो.
नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केलंय. मात्र त्यापूर्वी ठिकठिकाणी कचरा कुंडी ठेवाव्यात आणि कच-याची विल्हेवाट लावावी अशी मागणीही नागरिक करीत आहेत, तर विरोधी पक्षांनी मात्र या प्रस्तावाला विरोध केलाय.मुंबईतही महापालिकेनंही क्लिन अप मार्शलच्या माध्यमातून हा प्रयोग आणण्याचा प्रयत्न केलाय. मात्र मुंबई किती स्वच्छ झाली. हे बीएमसीलाच ठाऊक. उलट यातून चिरीमिरीचेच प्रकार वाढल्याचा आरोप झाला. त्यामुळं औरंगाबादेत तरी ही खबरदारी घेणं गरजेचं आहे.
First Published: Wednesday, May 30, 2012, 19:02